गोळीबार न केल्याबद्दल Thank You मोदीजी

Update: 2022-11-29 15:37 GMT

26 नोव्हेंबरला एकाच दिवशी तब्बल 40 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र चीनमध्ये कधीच न घडलेली घटना पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. त्यामुळेच चीनी सरकारचं टेन्शन वाढलं आहे. पण भारतात पंतप्रधान मोदी यांना Thank You म्हणण्याची वेळ का आलीय? जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की पहा.

सगळ्या जगात कोरोना पसरवणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी चीनमधील कोरोना निर्बंध हटवले होते. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चीन सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र या लॉकडाऊनला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. हुकूमशाही राजवट असलेल्या चीनमध्ये प्रथमच नागरिकांनी उघडपणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

चीनमध्ये नागरिकांनी रस्त्यावर आक्रमक निदर्शनं केले आहेत. या निदर्शकांवर गोळीबार केल्याचा दावा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला. अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, चीनमध्ये ना कोविड संपतोय, ना Lockdown, ना चीन सरकारची दंडेली. ताज्या गोळीबारात अनेकांचे बळी गेलेत. भारतात यातले काहीच घडले नाही, गोळीबार तर दूरची बात. कारण एकच पंतप्रधान मा.@narendramodi तरीही महाराष्ट्रातील घरबशे आणि देशभरातील विरोधक मोदींच्या नावाने गळा काढत होते.

कोरोना संकट सुरू असताना महाराष्ट्रातही भाजपने मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन केलं होतं. मोदी सरकारने लॉकडाऊन नियम शिथील करावेत, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र भारतात गोळीबार झाला नसल्याचं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. याचं श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे.

चीनमध्ये गोळीबार झाला मात्र भारतात झाला नाही, असं भातखळकर म्हणाले आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी भारतातही आंदोलकांवर गोळीबार करायला हवा होता का? लोकशाहीवादी भारताची तुलना चीनशी करून भातखळकरांना नेमकं काय सूचित करायचंय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांनी गोळीबार न केल्याबद्दल त्यांचे आभारच मानायचे का? असा सवाल उपस्थित होत आहे. एवढंच नाही तर चीनचे हुकूमशाही राष्ट्राध्यक्ष क्षी जीनपिंग यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करून अतुल भातखळकर अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांना हुकूमशहा तर म्हणायचं नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Full View

Tags:    

Similar News