चंदा कोचर यांचा अखेर राजीनामा

Update: 2018-10-04 14:13 GMT

व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिल्यामुळे अडचणीत आलेल्‍या ICICI बँकेच्‍या CEO चंदा कोचर यांनी आज अखेर आपल्‍या पदाचा राजीनामा दिला.

२०१६ साली ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे गुंतवणूकदार असलेले अरविंद गुप्‍ता यांनी एक ब्‍लॉग लिहून असा दावा केला होता की, 'चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे व्हिडिओकॉन गृपच्‍या मालकांशी व्‍यवसायिक संबंध आहेत.' त्‍यामुळे ICICI बँकेने दिलेल्‍या या कर्जावर अनेक प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले होते. सध्‍या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ICICI बँकेने व्हिडिओकॉन गृपला २०१२ साली 3250 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. हे कर्ज बँकेच्‍या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी मंजूर केले होते. मात्र, अरविंद गुप्‍ता यांनी या बाबीचा खुलासा केल्याने चंदा कोचर या अडचणीत आल्या. त्यानंतर त्या जून महिन्‍यापासून अनिश्चितकालीन सुटीवर होत्‍या.

आज त्यांनी आपल्या पदाचा अधिकृत रित्या राजीनामा दिला. त्यानंतर संदीप बक्‍शी यांची ICICI च्‍या सीईओ आणि एमडी पदी नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

Similar News