मुंबईत पाण्यासाठी संघर्ष, ३५ वर्षानंतरही पिण्याचं पाणी नाहीच

मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी नवी पाणीयोजना सुरू केली आहे. मात्र त्यानंतरही बोरीवलीतील नेगरूनगर भागात नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष कायम आहे. तर या नागरिकांना 35 वर्षानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याचाच वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Update: 2022-07-21 14:51 GMT


मुंबईतील नागरिकांसाठी मुंबई महापालिकेने नवी पाणी योजना जाहीर केली. मात्र अजूनही मुंबईच्या बोरीवली भागातील नेहरूनगर परिसरात नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेकडून शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्यांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र 35 वर्षे होऊनही बोरीवली भागातील नेहरूनगर परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप पहायला मिळत आहे.


 



बोरीवली भागातील नेहरूनगर परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी विहीरीतील पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र विहीरीतील पाणी दुषित असल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. तर महापालिकेने पाईपलाईन करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतू पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष कायम आहे.


 



या भागात 1100 हून अधिक लोक राहतात. मात्र त्यांना महापालिकेकडून पाण्याचा पुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वखर्चातून पाईपलाईन केली आहे. तर या पाईपलाईनसाठी मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. मात्र नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. त्यामुळे यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही संबंधित ठिकाणी भेट देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असं सांगितलं आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतच नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Full View

Tags:    

Similar News