देशात सर्वत्र बेरोजगारीच्या चर्चा सुरू असताना, अमरावती जिल्ह्यातील 'अश्रित अंध कर्मशाळा' या ठिकाणी असलेल्या दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांनी समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
आपल्या स्पर्श ज्ञानाच्या साहाय्याने हस्त कलेशी मैत्री करत, केनिंग च्या खुर्च्या तयार करून हे विद्यार्थी स्वयं रोजगार करत आहेत. त्यांना या शाळेच्या माध्यमातून खुर्च्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते व हेच प्रशिक्षण त्यांच्या स्वयंरोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
अंधत्वावर मात करून हे विद्यार्थी कशा पद्धतीने केनिंग च्या खुर्च्या तयार करतात हे तुम्हाला माहिती आहे का ? नक्की पहा आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांचा स्पेशल रिपोर्ट