Ground Report : पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, रायगडमध्ये रोज बनतंय ६ हजार पूरग्रस्तांसाठी जेवण

Update: 2021-07-30 12:23 GMT

रायगड : रायगड जिल्ह्यासह कोकणात जलप्रलयाने होत्याचे नव्हते केले. हजारो संसार उध्वस्त झाले. पूर ओसरला आहे पण अजूनही पूरग्रस्तांची जगण्यासाठी धडपड व संघर्ष सुरू आहे. पुरात घरं वाहून गेली. अन्न धान्य व जीवनावश्यक साहित्य वाहून गेले. घरात घाण व चिखलाचे साम्राज्य असल्याने अनेकांना अजूनही निवारा शोधावा लागतोय.



 

पण आता कोलमडलेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ वाढला आहे. पूरग्रस्तांना सर्वप्रकारे मदत देण्यासाठी सर्व राजकीय पक्षही कामाला लागले आहे. भाजपतर्फे महाड पोलादपूर येथील तब्बल 6000 पूरग्रस्तांना रोज गरम, ताजे जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


 



तसेच महिलांना आवश्यक असलेले साहित्य, कपडे देखील मोठ्या प्रमाणावर वाटप केले जात आहेत. या सेवाभावी कार्यात 300 हुन अधिक कार्यकर्ते रात्रंदिवस काम करीत आहेत. या मदतकार्याची पाहाणी आमदार निरंजन डावखरे यांनी देखील केली.

Tags:    

Similar News