घर डोळ्यासमोर पेटतं होतं पण काहीच करू शकले नाही. हजारो कुटुंब उध्वस्त झाली.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहेत. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली पाहायला मिळते. काल 13 मार्च रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील अप्पा पाडा, मालाड पूर्व, आनंद नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
मॅक्स महाराष्ट्र च्या ग्राउंड रिपोर्ट नुसार, मालाड पूर्व येथील अप्पा पाडा परिसरात अनेक झोपडपट्ट्या आहेत. या मध्ये अनेक घरं एकमेकांना जोडूनच आहेत. त्यामुळे एका घराला अचानक अचानक आग लागली. आगीच स्वरूप इतका भयानक होतं कि ही आग पसरून अप्पा पाडा मधील आनंद नगर, आंबेडकर नगर, पर्यँतं पसरली. काल रात्री पासून तब्बल 2,000 हुन अधिक झोपड्यां किंवा कुटुंबियांची घरं उजाडली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरू असताना एकाचा मृत्यू झाला.
आगीचं कारण
आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही झाले परंतु तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार झोपड्यांमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आणि एका मागे एक सिलेंडर चा स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या म्हण्यानुसार ही आग लेव्हल 2 ची आग आहे. ही झोपडपट्टी डोंगराळ भागात वनजमिनीवर असल्याने मुंबई अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडथळे आले.
घराला लागलेल्या आगीत अनेकांची हानी झाली. काहींनी भविष्यासाठी बचत केली होती, तर काहींनी लग्न संधर्भात लोन घेतले होते. उभ्या आयुष्यात मेहनत करून बनवलेलं सोनं काही क्षणातच विरघळलं. या झोपडपट्टीत अनेकांची असंख्य स्वप्न उराशी बांधली होती परंतु या आगीत स्वप्नांची राख रांगोळी झाली.स्थानिकांनी सर्व काही गमावले आहे. आता आयुष्याचा हा रंगाडा पुन्हा उभा करण्यासाठी या रहिवासी्यांना पूर्ण शून्यातून विश्व निर्माण करावे लागणार.