बीड शहरातला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे...!

बीड शहरातून जाणारा मुख्य बीड नगर पुणे मुंबई जोडणारा हा मुख्य रस्ता असून हा रस्ता खड्डेमय झाला असून नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, गेल्या वर्षी मॅक्स महाराष्ट्रने याविषयी बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आलं होतं याच रस्त्यावरील खड्ड्यासाठी गेल्यावर्षी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता,मात्र पुन्हा एकदा रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-09-04 14:11 GMT

 बीड शहरातून जाणारा मुख्य बीड नगर पुणे मुंबई जोडणारा हा मुख्य रस्ता असून हा रस्ता खड्डेमय झाला असून नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, गेल्या वर्षी मॅक्स महाराष्ट्रने याविषयी बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आलं होतं याच रस्त्यावरील खड्ड्यासाठी गेल्यावर्षी तब्बल दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता,मात्र पुन्हा एकदा रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट...




 


बीड शहरात येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी स्वरासह चार चाकी वाहनधारकांना सुद्धा या खड्ड्याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे मोठी वाहने रस्त्यावरून जात असताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे व याचा त्रास पादचारी करणाऱ्या नागरिकांबरोबरच दूचाकी स्वरांनाही सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

Full View

गेल्या वर्षी पावसाने जे खड्डे पडले होते ते आपण बुजवले होते यावर्षीही पावसामुळे खड्डे पडले आहेत पण या रस्त्याचे काम टेंडर प्रोसिजर मध्ये आहे त्याची टेंडर प्रोसिजर प्रोसिजर पूर्ण झाली आहे, कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर द्यायची बाकी आहे त्याला एकदा वर्क ऑर्डर दिली की तो येऊन मग पहिल्यांदा खड्डे बुजवण्याचे काम करेल व खड्डे बुजवून घेऊ... गेल्या वर्षी दहा ते बारा लाख रुपये खर्च या रस्त्यावर करण्यात आला होता... आत्ता होणारा जो रस्ता आहे तो सिमेंट रस्ता होणार आहे, आत्ताच जे रस्त्याचे टेंडर आहे ते 182 कोटी रुपयांचं आहे, या रस्त्याची लांबी 24.5 किलोमीटर असून तो लवकरच पूर्ण होईल, असे उपविभागीय अभियंता भोपळे यांनी सांगितले.

स्ता बघून गाडी चालवताना असं वाटतं की, नेमकं आपण रस्त्यावरून चाललोय की खड्ड्यातून चाललोय हेच कळत नाही माणसाला... सुद्धा खड्डा उगवता येत नाही एवढे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्याचं झालेलं आहे, वारंवार या रस्त्याची मलमपट्टी करायची आणि आहे तसाच पहिल्यासारखा रस्ता होत आहे हे क्वालिटीचं काम झालेलं नाही, गाड्यांची तर एवढी बिकट अवस्था झालेली आहे की, गाडीवर जावं की चलत जावं असं झालंय लोकांना... आमची अशी मागणी आहे की हा रस्ता एकदम क्वालिटी रस्ता झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे दुचाकी स्वार अजय ढाकणे म्हणाले.




 


शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे, कोरोना मध्ये जेवढे मृत्यू कोरोणाने झाले नाही तेवढे मृत्यू या रस्त्यावरील एक्सीडेंट मुळे झाले आहेत, पाठीचे आजार कमरेचा त्रास हे तर आजार वेगळेच आहेत मात्र आमची अशी मागणी राहील की, शहरातील जेवढे रस्ते खड्डेमय आहेत तेवढे बुजून घ्यावेत परंतु गुत्तेदार मात्र जशी पावडर तोंडाला असतो तसेच याच्यावर डांबर फासतात, एक पाऊस पडला की पुन्हा जशाला तसे खड्डे पडतात, गुत्तेदारांवर कारवाई करून चांगल्या क्वालिटीचे रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असे दुचाकीस्वार सत्वशील कांबळे म्हणाले.




 


इथले रस्ते फक्त पावसाळ्यात खराब होतात असं नाही, रस्तेच एकदम बोगस बनवलेले असतात, कारण इथले जे स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांची सगळी मिलीभगत आहे, गुत्तेदार,इंजिनियर यांची मिलीभगत असते आणि रस्ते अत्यंत बोगस बनवलेले असतात त्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी पुन्हा खड्डे जशास तसे पडतात, मूळ मुद्दा असा आहे की इथे जे सत्ताधारी आहेत त्यांचा त्याच्यावर अंकुश नाही, त्याच्यामध्ये त्यांना कमिशन असतं... इंजिनियर कडून कमिशन असतं... गुत्तेदाराकडून कमिशन असतं... हे सगळं कमिशन वर चालणारा सरकार आहे... सगळे कमिशन वर चालणारे अधिकारी कर्मचारी आहेत... या सगळ्यांनी मिळून या रस्त्याची पैसे खाल्लेले असतात, त्याचा रोजच्या रोज इथल्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे, बीड शहरात अर्ध्याच्या वर वाहनधारक हे पाठ मणका आणि कंबर याचे पेशंट आहेत,पण सरकारला याचं काहीही घेणं देणं नाही, पण याला मतदार जबाबदार आहे, आपण किती दिवस या खड्ड्यातून चालायचं बीडमध्ये रस्तेच नाहीत, इथला रस्त्याचा प्रश्न हा आजचा नाही, इथल्या नागरिकांनी रस्त्यावर येऊन हे रस्ते कायमस्वरूपी बंद करावेत आंदोलन करावे, किती दिवस सहन करायचं गाड्यांचे मेंटेनन्स निघायला लागले आहेत गाड्या खराब व्हायला लागल्या आहेत, आपण मेहनतीचा पैसा वाहन खरेदी करण्यासाठी लावतो पण ही वाहने या रस्त्यामुळे खराब होत आहेत, शाळेच्या मुलांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याचबरोबर त्यांचा जीव धोक्यात घेऊन त्यांना चालावं लागतं कित्येक वेळेस ट्युशनला जाता वेळेस गाडी खाली जाऊन मृत्यू झालेला आहे कुठल्याच सत्ताधाऱ्यांना याचं घेणं देणं नाही, इथले पालकही इतके वेळ जबाबदार आहेत की, लहान मुलं रस्त्यावर जातात त्यांचा जीव धोक्यात जात आहे याच्यावर आपण काहीतरी आंदोलन केलं पाहिजे, आपण ज्याला मतदान देतो त्याला जॉब विचारला पाहिजे, लहान मुलांची या दोन्हीमुळे डोळे चालले आहेत, रस्त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आहे, मागणी आहे की आपण बीड शहरातील सर्व सुजाण नागरिक रस्त्यावरून येऊन रस्त्यासाठी आंदोलन करावे अशीच मागणी पादचारी प्रशांत वासनिक यांनी केली.




 


आम्ही या रस्त्यासाठी वारंवार आंदोलने केली मात्र इथले जिल्हाधिकारी असतील किंवा पुढारी असतील ते फोर व्हीलर मध्ये फिरतात त्यांना या खड्ड्याची कसलीच जाण होत नाही, जाण आहे ती सर्वसामान्य नागरिकांना जिल्हाधिकारी व पुढारी यांनी एक दिवस या रस्त्यावरून दिवसभर मोटरसायकलवर फिरून दाखवाव त्यांना धुळीचा व खड्ड्याचा काय त्रास होतो ते त्यांच्या लक्षात येईल, अगोदरही आम्ही भरपूर आंदोलने केली, सरकार झोपलेलं आहे याला जागा करण्यासाठी याचे याच्यावर ठोस पावले उचलले पाहिजेत आणि असते करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे असं पादचारी नागरीकाचं म्हणनं आहे.

Tags:    

Similar News