अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी महिलेचा खुन की आत्महत्या ? पोलिसांकडून तपास सुरू
बीड तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे असे मयत महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सीमा डोंगरे या महिलेचे शव आढळले आहे. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या ? याचा तपास पोलिस करत आहेत.;
बीड तालुक्यातील अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या एका महिलेचा बीड परिसरातील पाली येथील तलावात मृतदेह सापडल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. सीमा सुरेश डोंगरे असे मयत महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाली येथील तलावात सीमा डोंगरे या महिलेचे शव आढळले आहे. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी पर्यंत ती नर्सचे काम करीत होती. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या ? याचा तपास पोलिस करत आहेत.
बीड तालुक्यातील पालीच्या बिंदुसरा तलवात आरोपी नर्सचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे . सीमा सुरेश डोंगरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सीमा सिस्टर नावाच्या महिलेवर अवैध गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. पण आज पहाटे सदर महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिचा पाली येथील तलावात सकाळी मृतदेह आढळला. ती बीडच्या डीपीरोड भागातील रहिवासी होती. काही महिन्यांपूर्वी ती नर्सचे काम करत होती.
सीमा डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी काल या प्रकरणी एका एजंट महिलेला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतचा एफआयआर दाखल झाला. त्यानंतर सीमा डोंगरे यांचा तलावात मृतदेह आढळला. सीमा यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गर्भपाताच्या रॅकेटवर पडदा टाकण्यासाठी तर हे घडवून आणलं गेलं नाही ना? असा संशय व्यक्त केला जातोय. याशिवाय या प्रकरणातून जी मोठी नावं समोर येऊ शकतात ती नावं समोर येऊ म्हणून अशा प्रकारचा घातपात घडवून आणण्यात आलाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पण सीमा यांच्या आत्महत्येमुळे पोलिसांपुढील आव्हानं वाढली आहेत.
पहिल्या तीन मुली असलेल्या महिलेचा चौथ्यांदा गर्भ राहिल्याने रविवारी मृत्यू झाला होता. यात शवविच्छेदन अहवालावरून हा अवैध गर्भपात असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुपारी लगेच गेवराई येथील एका महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.
मृतक 30 वर्षीय महिला या ऊसतोड मजूर होत्या. त्यांना अगोदरच 9, 6, आणि 3 वर्षांच्या तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. पण रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. यात संशय आल्याने पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून शवविच्छेदन करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी सकाळीच मयताच्या नातेवाईकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. त्यांनी याची कबुली दिली. त्यानंतर त्या सर्वांना घेऊन पोलीस ज्यांनी गर्भपात केला, अशा ठिकाणी पोहचले. गेवराई तालुक्यातील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी दुपारी अडीच वाजता ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली होती. यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच गर्भपात कोठे झाला आणि काढलेला गर्भाची कोठे विल्हेवाट लावली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
tags: