कुणी रस्ता देता का हो रस्ता? रस्त्यासाठी गावकऱ्यांचा ४० वर्षे पराकोटीचा संघर्ष
देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनी गाव भलामोठा, मात्र तिथं रस्त्याचा तोटा असं म्हणण्याची वेळ अलिबाग तालुक्यातील मळा ग्रामस्थांवर आली आहे. आजही रुग्ण, गर्भवती महिलांना खुर्चीत उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याची नामुष्की असून डोक्यावरच्या हंड्याची दूड घेऊन महिला, मुली व वृद्ध महिला अनेकदा पडून जखमी होत आहे. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनांचे पीक देत असून ग्रामस्थ आजही व्यथाग्रस्त असल्याचं चित्र आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट..;
मुंबईलगत असलेल्या व दिवसेंदिवस औद्योगिकदृष्टया विकसित होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक गावे , वाड्या वस्त्या आजही मूलभुत, पायाभूत, व नागरी सेवा सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, पाणी, यासाठी ग्रामस्थ पराकोटीचा संघर्ष करताना दिसतायेत. अशीच अवस्था जागतिक पर्यटन स्थळांचा दर्जा लाभलेल्या अलिबाग तालुक्यातील मांडवा, रेवस विभागातील मिळखतखार येथील मळा ग्रामस्थांची अवस्था रस्त्याअभावी बिकट झालीय.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायत हद्दीत मळा हे 40 घरांचे दीडशे लोकसंख्या असलेले गाव आहे. मिळकतखार गावातील नागरिक यांनीच गावात घरे बांधण्यासाठी जागा नसल्याने शेतावर आपले घर बांधले आणि मळा हे गाव वसले. 2002/03 साली नाबार्ड मार्फ़त ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत गावात जाणारा साडे दहा लाख खर्च करून रस्ता बांधला होता. मात्र मळा गावाच्या वेशीवर शेती असल्याने बांधावरून जाणारा रस्ता हा अपूर्णच ठेवला आहे. काही शेतकऱ्यांचा रस्ता देण्यास विरोध आहे.
कोणत्याही गावाच्या प्रगतीचे मूल्यमापन तेथील रस्ता व दळणवळणाच्या प्रभावी व नीटनेटक्या व्यवस्थेनुसार केले जाते. गावातील रस्ता चांगला असेल तर विकासाची गंगा वाहते . मात्र रस्ता नसेल तर गावाचा विकास खुंटतो. अशीच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील मिळकतखार मळा गावाचाही विकास रस्त्यामुळे खुंटला आहे . ४० वर्षांपासून मळा ग्रामस्थ हे रस्त्यासाठी झगडत आहेत . प्रशासन दरबारी व लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडतायेत, मात्र अद्याप रस्त्याची समस्या मार्गी लागली नाही हे दुर्दैव्य! आश्वासनात पुढारी, लोकप्रतिनिधी माहीर असतात, हे सर्वज्ञात आहे.
मळा ग्रामस्थांच्या मळ्यात आश्वासनांचे पीक येत असले तरी आश्वासनाशिवाय त्याच्या पदरात काहीच पडलेले नाही . रस्ता नसल्याने गावातील मूलभूत सुविधाही पोहचत नाहीत . आमचा रस्ता करा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नोटाला मत देऊन लोकप्रतिनिधींवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार मळा ग्रामस्थांनी केला आहे . कोणी रस्ता देता का रस्ता अशी बोलण्याची वेळ या मळा ग्रामस्थांवर आली आहे . अलिबाग तालुक्यातील मिळकतखार ग्रामपंचायत हद्दीत मळा हे ४० घरांचे दीडशे लोकसंख्या असलेले गाव आहे . मिळकतखार गावातील नागरिक यांनीच गावात घरे बांधण्यासाठी जागा नसल्याने शेतावर आपले घर बांधले आणि मळा हे गाव वसले .
२००२ साली नाबार्ड मार्फत ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत गावात जाणारा साडे दहा लाख खर्च करून रस्ता बांधला होता . मात्र मळा गावाच्या वेशीवर शेती असल्याने बांधावरून जाणारा रस्ता हा अपूर्णच ठेवला आहे . काही शेतकऱ्यांचा रस्ता देण्यास विरोध आहे . निवडणुकी काळात प्रचाराला येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी रस्ता करून देणार म्हणून आश्वासन देतो . मात्र निवडणूक झाली की जैसे थे परिस्थिती . गावात जाणारा रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती , गरोदर माता, यांना गावातील व्यक्ती उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन त्यानंतर वाहनाने रुग्णालयात नेत आहेत . शिवाय देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांना देखील याच खडतर व निमुळत्या रस्त्यावरून येता जाता दमछाक होते, रस्त्याची समस्या डोक्यावर असताना इथं पाण्याचीही समस्या मोठी असल्याने गावात नळ असूनही आठ दिवसाने पाणी येत आहे . टँकरने पाणी आणताना एक किलोमीटर वरून महिलांना डोक्यावर हंडा घेऊन शेताचा बांध तुडवत घरी यावे लागते . पाणी आणण्यासाठी रस्ता धड नसल्याने पाय घसरून डोक्यावरच्या हंड्याची दूड घेऊन महिला, मुली व वृद्ध महिला अनेकदा पडतात, जखमी होतात.
पावसाळ्यातर भयानक परिस्थिती होते. रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेचीही समस्या गावात भेडसावत आहे . गावात घराचे काम करायचे झाल्यासही अधिकच खर्च रस्त्याविना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . एक ना अनेक अडचणींचा सामना मळा ग्रामस्थांना करावा लागत आहे . प्रशासनाकडे रस्त्याबाबत निवेदन देऊनही प्रश्न अधुराच आहे . कोणी लक्ष देत नाहीत, एखादी सायकल बांधावरून न्यावी इतकाच रस्ता इथं उरला आहे, याला रस्ता म्हणू शकत नाही, अशी परिस्थिती. गावात जाणारा रस्ता नसल्याने चारचाकी वाहनेही ग्रामस्थांना गावाच्या बाहेर ठेवावी लागत आहेत .
शाळकरी मुलांनाही शेताच्या बांधावर कसरत करत शाळेत जावे लागत आहे .आमच्या सभोवताली मोठमोठे विकासक, सेलिब्रेटी व्हीआयपी यांच्या जागा आहेत, त्यामुळे येथील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत,असे असले तरी आम्हाला स्वातंत्र्या नंतर देखील आमच्या मूलभूत गरजांसाठी झटावे लागतेय याची खंत ग्रामस्थानी व्यक्त केलीय. रस्त्याची आमची समस्या सोडवावी आणि आमच्या गावाचा खुंटलेला विकास दूर करावा अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी केली आहे .
गावात जाणारा रस्ता नसल्याने आजारी व्यक्ती, गरोदर माता यांना गावातील व्यक्ती उचलून मुख्य रस्त्यापर्यंत नेऊन त्यानंतर वाहनाने रुग्णालयात नेत आहेत. पाण्याचीही समस्या मोठी असल्याने गावात नळ असूनही आठ दिवसाने पाणी येत आहे. टँकरने पाणी आणताना एक किलोमीटर वरून महिलांना डोक्यावर हंडा घेऊन शेताचा बांध तुडवत घरी यावे लागते. पावसाळ्यातही रस्ता नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजेचीही समस्या गावात भेडसावत आहे. गावात घराचे काम करायचे झाल्यासही अधिकच खर्च रस्त्याविना ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. एक ना अनेक अडचणींचा सामना मळा ग्रामस्थांना करावा लागत आहे. मात्र शासन दरबारी रस्त्याबाबत निवेदन देऊनही प्रश्न अधुराच आहे.
येथील तरुण ग्रामस्थ रणजित ठोंबरे व इतर ग्रामस्थांच्या साथीने रस्त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, या लढ्यात तरुण, वृद्ध तसेच महिलांची देखील एकजूट पहावयास मिळतेय. आम्ही लहान होतो, तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या गावाला रस्ता नाही, रस्त्यासाठी आम्ही संघर्ष करतोय, लढतोय, सरकारने आम्हाला रस्ता देण्यासाठी योग्य ती दखल घ्यावी, गावाला विकासाच्या झोतात आणण्यासाठी रस्ता महत्वाचा असून प्रशासनाने देखील रस्त्याच्या कामातील धोंडे दूर करून गावाला जोडणारा रस्ता निर्माण करून सहकार्य करावे अशी मागणी ठोंबरे यांनी केलीय.