पंढरीच्या वाटेवर संविधानाची दिंडी...
विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोंचा महासागर पंढरपुरात दाखल होत असताना शाहिरी,जलसा,गीत गायनाच्या माध्यमातून महापुरुषांचे कार्य वारकऱ्यांना सांगितण्याचे कामडॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (BARTI)कडून होत आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...;
पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमत्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या असून येत्या 10 दहा तारखेला आषाढी वारी आहे. वारकरी पंढरपूरकडे गेल्या महिन्यापासून पायी चालत येत आहेत. यात पुणे जिल्ह्यातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याचा समावेश होतो. या दिंड्या पंढरपूरकडे येत असताना यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी झालेले असतात. या दिंड्या पंढरपूरकडे येत असताना विविध ठिकाणी मुक्काम करत असतात. रस्त्यात ठिकठिकाणी गोल रिंगण आणि उभे रिंगण होत असते. या दिंड्यात विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले असतात. त्यामुळेच सामाजिक न्याय विभागाने अभिनव उपक्रम राबवत आळंदी ते पंढरपूर 'संविधानाचा जागर ' या दिंडीचे आयोजन केले असून या दिंडी मार्फत वारीत सामाजिक न्याय विभागाच्या योजना लोकांना समजावून सांगितल्या जात आहेत. तसेच महापुरुषांच्या कार्यावर जलसा,शाहिरी आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) पुणे ही करत आहे. त्यांच्या कामाचे वारकर्यातून स्वागत करण्यात येत आहे.
शाहिरी,जलसा,गीत गायनाच्या माध्यमातून महापुरुषांचे कार्य वारकऱ्यांना सांगितले जाते
वारीत हजारो भाविक सहभागी झालेले असतात. त्यांच्यात विविधतेत एकता असल्याचे दिसते. ते वेगवेगळ्या धर्म, पंत आणि जातीतून या वारीत सहभागी झालेले असतात. पुण्यातून निघणाऱ्या दिंड्या जवळपास वीस दिवसाचा प्रवास करून पंढरपुरात पोहचतात. या दिंड्या मध्ये महिला,पुरुष,वृद्ध,लहान मुले सहभागी झालेले असतात. या वारकऱ्यांना पंढरपूरची ओढ लागली असताना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने त्यांच्यात संविधाना विषयी जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. भारताचे संविधान हे सर्वधर्म समभाव आहे. त्यांच्यात समानता पहायला मिळते. त्याच समानतेची जनजागृती सामाजिक न्याय विभाग करत आहे. ही साविधन दिंडी ज्या गावात जाते येथे लोकांना डॉ.बाबासाहेब आंबडकर,महात्मा फुले,शाहू महाराज हे गीत गायनाच्या माध्यमातून समजावून सांगितले जात आहेत. त्यांचे विचार वारीतील वारकऱ्यांना आणि गावकऱ्यांना समजावून सांगण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी लोकांना माहिती दिली जात आहे
सोलापूर समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त सुलोचना सोनवणे यांनी बोलताना सांगितले,की 21 जून पासून आषाढी एकादशीची वारी चालू आहे. आळंदी,पुणे,बारामती,सासवड या मार्गाने सविधान दिंडीने सोलापूर जिल्ह्यात नातेपुते येथे प्रवेश केला आहे. सामाजिक न्याय विभाग विविध माध्यमातून सामाजिक विभागाच्या योजना समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहचवत असतो. त्यांच्यासाठी कल्याणकारी काम सामाजिक न्याय विभाग करत आहे. यामध्ये घर बांधणी,विद्यार्थ्यांचे शिक्षण,रमाई आवास घरकुल योजना, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम,व्यसनमुक्ती कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबवले जात आहेत. सामाजिक न्याय विभागाला योजना संबधी जनजागृती करण्याची वारीत ही खूप मोठी संधी होती. महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय लोक वारीत येत असतात. त्यांच्यापर्यंत या योजना पोहचवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था करत असून त्यांनीच या संविधान दिंडीचे आयोजन केले आहे. पुणे सातारा आणि आता सोलापूर जिल्ह्यात ही दिंडी प्रवेश करत आहे. या दिंडी मधून सामाजिक न्याय विभाग जनजागृतीचा कार्यक्रम करत आहे. शाहिरी आणि गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रश्न मंजुषा कार्यक्रम तसेच चालता बोलता कार्यक्रम,आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जात आहेत. या वारीत ग्रामीण भागातून लोक येतात,त्यामुळे त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. या संविधान दिंडीला मान्यवर भेट देत असून त्यांना संविधांची प्रस्ताविका भेट दिली जात आहे. या संविधानाच्या दिंडीच्या माध्यमातून विविध महापुरुषांचे कार्य लोकांना समजावून सांगण्याचे काम केले जात आहे.
संविधान दिंडीची समाप्ती पंढरपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार
संविधान दिंडी गेल्या अनेक दिवसापासून वारीत जनजागृती करण्याचे काम करत आहे. या मध्ये सामाजिक न्याय विभागाची टीम काम करत असून त्यांनी लोकं चांगल्या प्रकारे जनजागृती करण्याचे काम केले आहे. येत्या दहा तारखेला आषाढी वारी असून या संविधान दिंडीचा समारोप पंढरपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.