Chandrakant patil : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपीच्या जामिनावर सुनावणी पूर्ण
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याच्या आरोपीच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे.;
कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao patil), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केले होते. या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले होते. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली आहे.
चंद्रकांत पाटिल यांनी महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या संदर्भात रयत शिक्षण संस्थेने देखील पत्रक काढून निषेध व्यक्त केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. त्यांच्या याच विधानाचा निषेध म्हणून मनोज गरबडे या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने इतर साथीदारांसोबत चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली होती. यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात ३०७ , ३५३ सारखे गुन्हे नोंद केले आहेत.
आज त्यांना कोर्टासमोर हजर केले असता आरोपीच्या वतीने जोरदार प्रतिवाद केला. न्यायालयाने आरोपीना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टाबाहेर हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.