मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गोंधळ...

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते, ही शिष्यवृत्ती केंद्र सरकारने केंद्राच्या वाट्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची किती व संबंधित महाविद्यालयाची किती यामुळे विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, या गोंधळात विद्यार्थी भरडत असल्याबाबतचा प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट...;

Update: 2022-09-12 12:04 GMT

बीड जिल्ह्यासह राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते, ही शिष्यवृत्ती केंद्र सरकारने केंद्राच्या वाट्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची किती व संबंधित महाविद्यालयाची किती यामुळे विद्यार्थी व महाविद्यालय यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे यामुळे महाविद्यालयाला देण्यात येणारी रक्कम किती याचा उलगडा अजून झालेला नाही. काही महाविद्यालय विद्यार्थ्यांना पूर्ण रक्कम मागत आहेत तर, मग शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना किती मिळणार यामुळे महाविद्यालय व विद्यार्थी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

महाविद्यालयांमध्ये याच्याविषयी अगोदर डेमो दिला होता व त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं, अशा पद्धतीने त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे, आणि 60% अकाऊंट ही कशा पद्धतीने जमा होणार आहे, सर्व कल्पना महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना डेमो द्वारे देण्यात आलेली आहे, त्या पद्धतीचं हमीपत्र सुद्धा विद्यार्थ्यांकडून आम्ही घेतलं होतं, ही पूर्वकल्पना आम्ही तुम्हाला देतोय, ज्यावेळेस शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटला येईल त्याच्या मधली 20% रक्कम ही तुमच्या अकाउंटला जाईल व 60% रक्कम ही कॉलेजला द्यावी लागेल आणि ती रक्कम महाविद्यालयात 7 दिवसाच्या आत आणून जमा करावी लागेल, त्याची पूर्वकल्पना आम्ही विद्यार्थ्यांना दिली होती, 60% ची रक्कम जरी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली असेल तरीही शासनं निर्णयाप्रमाणे ती अमाऊंट विद्यार्थ्यांना 7 दिवसाच्या आत महाविद्यालयात जमा करावी, जेणेकरून पुढील प्रवेश प्रक्रिया किंवा परिक्षा फाॅर्म भरता वेळी महाविद्यालयातील काही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, समाज कल्याण विभागाला ही विनंती करतो की काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 50/ ते 60% शिष्यवृत्ती जमा झाली आहे, उर्वरित विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जमा झालेली नाही, बाकीच्या विद्यार्थ्यांनाही उत्सुकता आहे की आमची ही शिष्यवृत्ती कधी मिळते मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना विनंती करतो की उर्वरित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर जमा करावी, असे तुलसी संगणक महाविद्यालयाचे डिजे निकाळजे म्हणाले.

विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं त्याची स्कॉलरशिप जी आहे ती माझ्या जनधनच्या खात्यावर पडलेली आहे यांच्या खात्यावरून फक्त प्रति महिना दहा हजार रुपये काढता येतात, चंदनच्या खात्यावरून दहा हजार रुपये कधी काढायचे आणि कधी कॉलेजला द्यायचे माझ्या खात्यावर पहिल्या वेळेस 3 हजार रुपये जमा झालेली आहे आणि नंतर 16 हजार रुपये जमा झालेली आहे मग ती रक्कम जनधनच्या खात्यावरून कशी काढायची त्यामुळे मला अडचण येत आहे. असे विद्यार्थी भारत कोरडे म्हणाले.

माझ्या मित्राची शिष्यवृत्ती मिळाली आहे परंतु माझी शिष्यवृत्ती मला मिळालेली नाही मी सरांना विचारणा केली असता सरांनी सांगितले की मी दोन दिवसात समाज कल्याण विभागाला विचारणा करून सांगतो असे सरांनी उत्तर दिल्याचे संजय कोरडे म्हणाले. आमच्या महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे मात्र मला शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यामुळे शासनाने असा दुजाभाव करू नये. सर्वांना समान शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.


Full View

Tags:    

Similar News