आव्हाडांनी स्वतःच्या मानसिक, शारिरिक आरोग्याची काळजी करावी – नीलम गोऱ्हे
मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली असून पालकांनी आपली मुलं सांभाळावी असं उपहासात्मक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय. जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचं मानसिक, शारिरिक आणि वैचारिक आरोग्याची काळजी करावी, अशी एक भगिनी म्हणून माझी त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचं म्हटलंय. जितेंद्र आव्हाडांची काळजी स्वाभाविक आहे. कारण सध्या त खुप संकटात आहेत. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी उपहासात्मक टीकाच गोऱ्हे यांनी केलीय.
विखे-पाटलांनी टेबलाखालून हातमिळवणी केली – नीलम गोऱ्हे
विरोधी पक्षनेत्यांनी स्वतः पक्षांतर केलं नाही. मात्र, त्यांच्या चिरंजीवांनी पक्षांतर केलेलं आहे. अशा परिस्थितीतही विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांची कामगिरी सुमारचं होती, अशी टीका मी वेळोवेळी केल्याचं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं. विरोधी पक्षांनी आमच्यावर टीका केली नाही हे सत्ताधाऱ्यांसाठी चांगलंच आहे. पण विरोधी पक्षाचं कर्तव्य पार पाडण्याऐवजी त्यांनी टेबलाखालून हात मिळवणी केली, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. सुजय यांचे आजोबाही शिवसेनेत आले होते. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळालं होतं.
शेवटी शिवसेना भाजप चा जो हेतू आहे तो कुठं तरी कंग्रेस आणि राष्ट्रवादी कॅंग्रेस विटून कंटाळुन जेवढी लोक बाहेर पडतील तेवढ चांगलंच आहे. परंतू मला असं वाटतं की, फार मोठा तीर मारला अस कॅंग्रेसला वाटत होतं ज्या वेळी नारायण राणेंना घेतलं त्या वेळी पण त्याची एक चांगली वजाबाकी भाजप ने आज करून दाखवलेली आहे. फक्त सुजय विखे पाटलांनी परत आता पाठी फिरण्याची भुमीका घेवू नये. हे त्यांनी सांभाळं पाहीजे नाहीतर पुन्हा त्यांच आयाराम गयारामच्या यादीत नाव येइल.