अंधेरी पूर्व पोटनिवडणूक मतदानादिवशीही आरोप प्रत्यारोपांनी गाजली

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले. या मतदानासाठी काही मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. पण दिवसभरात नेमकं काय घडलं याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट;

Update: 2022-11-04 03:58 GMT

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले. या मतदानासाठी काही मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. पण दिवसभरात नेमकं काय घडलं याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्टअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले. या मतदानासाठी काही मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. पण दिवसभरात नेमकं काय घडलं याचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांचा ग्राऊंड रिपोर्ट

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदान झाले. या निवडणूकीत सकाळी काही काळ मतदारांचा उत्साह पहायला मिळाला. मात्र त्यानंतर मतदारांचा उत्साह कमी झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मतदान पुर्ण होताच अवघ्या 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केल्याचे समोर आले. त्यामुळे यावेळी मतदारांचा अनुत्साह पहायला मिळाला. दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीवेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर नोटाचा प्रचार केल्याचा आरोप केला. त्याबरोबरच अनिल परब यांनीही भाजप पैसे वाटून नोटाचा प्रचार करत असल्याचे म्हटले. त्यामुळे भाजपचा उमेदवार नसतानाही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपची चर्चा रंगली होती.

मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेले आरोप भाजपने फेटाळून लावले. तसेच पैसे वाटले असल्याचे अनिल परब यांनी सिध्द करून दाखवावे, असं मत भाजपचे रुपेश दांडेकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. मात्र दिवसभरात मतदारांनी दाखवलेल्या अनुत्साहामुळे बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Full View

Tags:    

Similar News