अजित पवार मुख्यमंत्री? महिनाभरातच शिंदे गट विरुध्द अजित पवार गटात खडाजंगी
अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात रंगली आहे. त्यातच अजित पवार गटाच्या नेत्याने ट्वीट केलं आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्याला एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्त्यानेही उत्तर दिलंय. पण नेमकं काय घडलंय? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...
अजित पवार यांन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला नाही. तोच एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडील 3 तर भाजपकडील 6 खाती मिळवत अजित पवार यांनी सरकारमध्ये आपणच दादा असल्याचे संकेत दिलेत. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात सुरु असतानाच अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे म्हटले आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, लवकरच... अजितपर्व असं म्हणत अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यानंतर संजय राऊत यांनीही अमोल मिटकरी यांच्या ट्वीटचा दाखला देत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटल्याने त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी होऊन एक महिनाही पूर्ण झाला नसताना अजित पवार गट आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात आणखी एक भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.