बीडमध्ये शेकडो महिला का उतरल्या रस्त्यावर?

Update: 2022-09-15 14:16 GMT

बिल्कीस बानो प्रकरणात बीड शहरात गुरूवारी महिलांनी मूक मोर्चा निघाला. या निषेध मोर्चामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. मोर्चामध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच मुस्लिम धर्मगुरूंबाबत वारंवार केला जाणाऱ्या वक्तव्यांचा निषेध केला गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या महिलांनी तासभर ठिय्या आंदोलन केले.


Full View

Tags:    

Similar News