खासदार धनंजय मुन्ना महाडिक यांच्या भीमा साखर कारखान्याच्या विरूद्ध कामगारांचे आंदोलन
सोलापूर : वर्षानुवर्षे कारखानदार आणि कामगार यांच्यात सातत्याने संघर्ष होत असल्याचे पहायला मिळते. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत घडला आहे. या कारखान्याचे चेअरमन भाजपाचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय मुन्ना महाडिक आहेत. त्यांच्या साखर कारखान्यातील कामगार सातत्याने विविध मागण्यासाठी आंदोलने करत असतात. या कारखान्यातील कामगारांचे अनेक वर्षांचे पगार थांबल्याने त्याने आमरण उपोषणाचा ही मार्ग अवलंबला होता. कारखान्यांनी लवकर पगारी द्याव्यात,असे कामगारांचे म्हणणे आहे. यासाठी या कारखान्यातील कामगारांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालया समोर जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.
सोलापूर जिल्ह्यात उसाच्या संदर्भाने सातत्याने आंदोलने सुरू असतात. यामध्ये उसाला हमीभाव देण्यात यावा, एफआरपीच्या रक्कमेचा प्रश्न तर सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून यासंबधी शेतकरी संघटना आंदोलने करत आहेत. पण कारखान्यांनी थकवलेल्या एफआरपीच्या रक्कमा सतत तटवण्याचे काम केले आहे. त्यामुळे यासंबंधी सोलापूर जिल्ह्यात सतत आंदोलने सुरू असतात. शासनाने या एफआरपीचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा,अशी मागणी आता शेतकरी संघटनातून जोर धरू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालय येथे जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांनी थकवलेल्या ऊस बिलाच्या संदर्भात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
ऊस पट्ट्यात सातत्याने होत आहेत आंदोलने
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त उसाचे क्षेत्र आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात तीस च्या आसपास साखर कारखाने आहेत. भीमा,सिना आणि जोड कालव्यामुळे या भागात उसाचे क्षेत्र वाढतच चालले आहे. यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकरी संघटनांनी अतिरिक्त ऊस कारखान्याला घेवून जवा यासाठी आंदोलने ही केली होती. पण शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला लवकर जात नव्हता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ऊस जाळून कारखान्याला घालवला. ऊस कारखान्याला जावून ही उसाच्या बिलासाठी परत शेतकऱ्यांना आणि शेतकरी संघटनेना आंदोलने करावी लागत आहेत. तसेच उसाच्या पिकाला हमीभाव देण्यात यावा,अशी मागणी सातत्याने केली जाते,पण ती शासनाकडून पूर्ण केली जात नाही. तसेच अनेक साखर कारखाने कामगारांच्या पगारी थांबवत असल्याने साखर कारखानदार,शेतकरी,शेतकरी संघटना यांच्यात सातत्याने आंदोलन,मोर्चे यातून संघर्ष होत असल्याचे दिसून येते. यावर ठोस असा उपाय काढण्यात यावा,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
भीमा साखर कारखान्याच्या विरोधात कामगारांची आंदोलने
मुन्ना महाडिक चेअरमन असलेल्या भीमा साखर कारखान्याच्या विरोधात कामगार सतत आंदोलने करत असतात. या कारखान्याने गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या पगारी थांबल्या आहेत. त्या देण्यात याव्यात,अशी कामगारांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा आमरण उपोषणे केली. बेमुदत आंदोलन केली. पण आंदोलन आणि मोर्चानी हा प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसल्याचे दिसून येत आहे. सातत्याने महिन्या दोन महिन्यातून या कारखान्याच्या विरोधात कामगार आंदोलनाचे हत्यार उपसत असतात. आता मुन्ना महाडिक राज्यसभेचे नवनिर्वचित खासदार झाल्याने या कामगारांना मोठी आशा लागून राहिली आहे. राहिलेल्या रक्कमा लवकरच मिळाव्यात असे त्यांना वाटत आहे. पगरीचा रक्कमा नाही मिळाल्यास कामगार सातत्याने आंदोलने करतच राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले.
शेतकरी संघटनेच्या या आहेत मागण्या
मोहोळ तालुक्यातील आष्टी शुगर या कारखान्याने थकीत एफआरपीची रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी. ती जमा करत असताना व्याजासहित करावी. भिमा सहकारी साखर कारखान्याने थकवलेली एफआरपीची रक्कम पंधरा टक्के व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अनगर येथील कारखान्याने ही शेतकऱ्यांची थकवली रक्कम जमा करावी. भिमा सहकारी साखर कारखान्यातील हंगामी कामगारांच्या खात्यावर 2018 पासूनचे थकीत पगार त्वरित जमा करावेत. आष्टी येथील साखर कारखान्याने शेतकऱ्यांना साखरेचे वाटप केलेले नाही. ते त्यांनी दिवाळीला 50 किलो शेतकऱ्यांना आणि 25 किलो कामगारांना द्यावी. भिमा साखर कारखान्यातील कामगारांच्या पीएफ च्या रक्कमा कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांच्या खात्यावर जमा कराव्यात. अशा मागण्या निवेदनात जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
एफआरपीच्या रक्कमेसंबधी माहिती घेवून सांगतो
मी सध्या ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये असून कामगारांच्या एफआरपीच्या रक्कमेसंबंधी माहिती घेवून सांगतो असे भिमा शुगर चे व्हाइस चेअरमन सतीश जगताप यांनी सांगितले.