3 दशकानंतरही किल्लारी एसटी स्टँडविना

Update: 2023-06-09 13:59 GMT

30 सप्टेंबर 1993. किल्लारीत भूकंप झाला आणि तब्बल 10 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यानंतर किल्लारीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. पण अजूनही किल्लारीतील नागरिकांना बसस्थानक मिळालं नाही. याचाच वेध घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी वैजिनाथ कांबळे यांनी....

किल्लारीतील भूकंपाला 30 वर्षे झालेत. पण अजूनही आमच्या गावात बसस्थानक नाही. येथे मोठी बाजारपेठ असल्याने बावन्न गावचे लोक किल्लारीला येत असतात. या लोकांचे आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे बसस्थानक नसल्याने हाल होत असल्याचे किशोर जाधव या नागरिकाने सांगितले.

बसस्थानकासाठी सरकारने नियोजित जागा दिली आहे. पण त्या जागेवर एक वीटही रचली गेली नसल्याचे राजाराम जाधव सांगतात.

शासनाने नियोजित जागा दिलीय. त्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला. पण बस स्टँड काही झालेच नाही. गावची लोकसंख्या 25 हजार आहे. गावात महाविदयालये, बँका, आठवडी बाजार असतो. मात्र बसस्थानक नसल्याने नागरिकांना उन्हातान्हात उभं रहावं लागत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

किल्लारीतील महिलांना, वृध्दांना, विद्यार्थ्यांना ऊन, पावसात उभं रहावं लागतं. त्यामुळे किल्लारीमध्ये बसस्थानक निर्माण करण्यात यावं, अशी मागणी महिलेने केली आहे.

किल्लारीला 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने किल्लारीच्या पुनर्वसनाची गाथा गायली जाईल. पण यामध्ये किल्लारीतील लोकांसाठी असलेलं बसस्थानक तयार करावं आणि किल्लारीतील नागरिकांना दिलासा द्यायला हवा.

Tags:    

Similar News