2 हजार देतात आणि 200 रुपयाचे पेट्रोल टाकतात, नोटबंदीनंतर पेट्रोल पंप चालकांची कोंडी
दोन हजार रुपयाची नोट बंद झाल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील नोटा बँकेमध्ये जमा न करता पेट्रोल भरण्यासाठी वापरायला सुरुवात केली. मात्र पेट्रोल पंप चालकांना नेमका कसा अनुभव येतो? याचाच वेध घेण्यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अतुल गोडसे यांच्या रिपोर्ट.;
रिजर्व बँकेने 2000 च्या नोटा हळूहळू चलनातून काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंदर्भातला आदेश 19 मे 2023 रोजी काढण्यातही आलाय. मात्र, या निर्णयानंतर संभ्रमित झालेल्या नागरिकांनी दोन हजार रूपयांच्या नोटा व्यवहारात आणून त्यापासून सुटका करून घेण्यासाठी पेट्रोल पंपाचा आधार घ्यायला सुरूवात केलीय.
आपल्या जवळील 2000 ची नोट घेऊन नागरिक पेट्रोल भरण्यासाठी येतात. 200 रूपयांचं पेट्रोल भरतात आणि 2000 ची नोट देतात. त्यामुळं आमच्या कर्मचार्यांना अनेक समस्या येतात. सर्वच नागरिक 200 रूपयांची नोट देत आहेत. आम्ही सर्व जणांना परत सुट्टे देऊ शकत नाही. त्यामुळं नागरिक आमच्या कर्मचार्यांसोबत वाद घालत आहेत. आम्ही त्यांना 2000 रूपयांचं पूर्ण पेट्रोल भरण्यास सांगतो, असं रेडियंट पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक (manager ) रामनिवास यांनी सांगितले.
सकाळपासूनच अनेक जण 2000 रूपयांची नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत. यामुळे तेथील कर्मचारी तुम्हाला सुट्टे पैसे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असे सांगत आहेत. त्यामुळे नागरिक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात.
दोन हजार रूपयांच्या नोटबदलीचा आज पहिलाच दिवस आहे. त्यामुळं बँकांसमोर सध्या ग्राहकांच्या रांगा दिसत नसल्या तरी इतर मार्गाने ग्राहक २ हजार रूपयांच्या नोटा बदलून घेत आहेत. त्यामुळं पहिल्या नोटबंदीप्रमाणे सध्यातरी बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा दिसत नाहीत. मात्र या नोटबंदीचा ताण पेट्रोल पंपावर आल्याचं चित्र दिसत आहे.