बीड जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरू...! मृत्यूचे प्रमाण वाढले...!

बीड जिल्ह्यात राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरूच असल्याने अनेक जणांचे प्राण जात आहेत, एकीकडे रस्ते चांगले नाहीत म्हणून अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो तर रस्ते चांगले झाल्यानंतरही रस्त्यावरून जाणारी सुसाट वेगाची वाहने हे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत याविषयीचा मॅक्स महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिदास तावरेंचा एक स्पेशल रिपोर्ट...;

Update: 2022-09-11 12:18 GMT

 बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग सोलापूर - धुळे किंवा राज्य महामार्ग अहमदनगर - अहमदपूर या रस्त्यावर दररोज अनेक अपघात होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र याच अपघातामध्ये जे दुचाकीस्वार असतील किंवा चार चाकी वाहन चालक असतील यांना अपघात झाल्यानंतर चक्क मरणच पत्करावा लागत आहे कारण राज्य महामार्ग अहमदनगर अहमदपूर या रस्त्यावर दिशादर्शक फलक कुठेही लावण्यात आलेले नाहीत आणि याच कारणामुळे अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्याचबरोबर जे दुचाकीस्वार आहेत ते हेल्मेट वापरत नाहीत त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यानंतर दुचाकी मरण पावत असल्याचेही निदर्शनास येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या राज्य महामार्गावर दिशादर्शक फलक बसवावे अशीच मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.





 


तरुण मुलं हे सुसाट वेगाने वाहने चालवतात त्यामुळे त्यांना वाहन कंट्रोल होत नाही त्यामुळेही अपघात होत आहेत, तरुण मुलांना माझी विनंती आहे की आपण वाहने हळू चालवावीत व आपला जीव वाचवावा, असे विनायक राऊत म्हणाले.


 



माननीय नितीन गडकरी साहेबांनी हा रस्ता जो आहे तो चांगल्या रीतीने बनवलेला आहे मात्र दुचाकीस्वार आपली लेन सोडून चालत आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शहराला जोडणारा जो धुळे सोलापूर महामार्गावरील बायपास आहे त्या महामार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र लेन सोडून चालल्यामुळे हा अपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे दिपक कदम म्हणाले.

Tags:    

Similar News