Ground Report : दोन नद्या बाजूला पाणी नाही गावाला
धरण उशाशी असूनही त्या भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आपण कायम ऐकत असतो. पण सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील भाटशिरगाव हे गाव दोन नद्यांच्या मध्ये वसलेले असूनीह या गावातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. "पाणी आमच्या उशाला, कोरड पडली घशाला," अशीच काही अवस्था शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील ग्रामस्थांची झाली आहे. याच गावाची व्यथा दाखवणारा आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांचा रिपोर्ट...
या गावाच्या दोन्ही बाजूने वारणा आणि मोरणा नावाच्या नद्या दुधनडी वाहत आहेत. मात्र या गावाला पाणी मिळत नाही अशी अवस्था झाली आहे. या गावाला 2018-19 ला राष्ट्रीय पेयजल योजनेचे 78 लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे कंत्राटही दिले गेले मात्र गेल्या दोन वर्षा पासून हे काम रखडले आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याबाबत भाटशिरगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचतीवर घागर मोर्चा काढला. याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला तर त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.