#AzadiKaAmritMahotsav : Ground Report : पाणी पुरवठा योजना कागदावरच, पाणी कुठे मुरलं?
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केली जात आहे. पण अजूनही देशातील अनेक गावांना मुलभूत सोयी-सुविधा मिळालेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी १४ वर्षांपासून वनवास भोगणाऱ्या बीड जिल्ह्यातील बनकरंजा गावाचा संघर्ष मांडला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...
केज शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल बनकरंजा हे गाव….पुनर्वसन झालेलं गाव आहे. या गावासाठी 2008 साली सरकारने भारत निर्माण योजना राबवली. मात्र 2008 पासून 2022पर्यंत ही योजना पूर्ण झालेली नाही. एवढेच काय तर ही योजना ग्रामपंचायतीला देखील हस्तांतरित करण्यात आली नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे. पण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बनकरंजा येथील कुंभारवाडा या वस्तीवर भारत निर्माण पाणी पुरवठा योजना राबवण्याचे ठरले होचे. पण या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावातील नागरीक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे व जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कऱण्यात आली आहे.
याबाबत आम्ही जिल्हा परिषदेचे सीईओंना गाठले, त्यावर मॅक्स महाराष्ट्रने गावकऱ्यांच्या तक्रारींवर आधारित दिलेल्या माहितीबाबत एका चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करणार असल्याची माहिती सीईओ अजित पवार नी सांगितले. एका गावाला पाणी मिळण्यास १४ वर्षांचा वनवास भोगूनही पुन्हा प्रतिक्षा लागत आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना असे प्रश्न कायम असतील तर स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात काय मिळाले, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो...