Ground Report : पाणीटंचाईचे भीषण वास्तव, आदिवासी पाड्यांची तहान कधी भागणार?
पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुका विकासापासून कोसो दूर आहे. मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 25 ते 30 किमी अंतरावर आसे ग्रामपंचायत मधील 250 घरांच्या 745 लोकवस्तीच्या भोवाडी गावाला फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.
पाण्यासाठी इथल्या लोकांना 4 किमी अंतरावर असलेल्या नदीतून खड्डा खोदून दूषित पाणी प्यावे लागते. दिवसभराचे कामकाज सोडून इथल्या आदिवासी बांधवांना आपल्या मुलाबाळांना गेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. एवढेच नाही तर इथे उन्हाळा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी टँकरने पाणी मिळते. पण केवळ एकच टँकर पाणी मिळत असल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहे. आदिवासी पाड्यांवर चटके देणारे वास्तव मांडणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...