पालघर : घरची परिस्थिती हालाखीची… पती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, पोरगं शिकून आम्हाला चांगलं दिवस आणील, या आशेने आई काबाड कष्ट करून मामाच्या गावाला राहून मुलाला शिक्षण देत होती. दहावी पास झालेला मुलगा लवकरच कॉलेजला जाईल ही आईची आशा. मात्र, या रंगवलेल्या स्वप्नांवर एक दिवस अचानक काळाने घाला घातला.
भावेश हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात वडाच्या झाडावर मुलांसोबत खेळायला गेला, परंतु तिथे सुरू असलेल्या वीजेच्या मेन लाईनचा शॉक लागून तो झाडावरून खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली व उपचारादरम्यान नाशिकमध्ये त्याचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा गेल्याने या घटनेचा त्याच्या आईवर गंभीर परिणाम झाला आहे, तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही वेदनादायी घटना आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील भेंडीचापाडा या आदिवासी पाड्यामधील...
दहावीत शिकणारा भावेश कृष्णा भुरकूट वय (17) याचा 3 महिन्यांपूर्वी मोखाडा इथून खोडाळ्याकडे जाणाऱ्या नवीन मेनलाईनचा शॉक लागून मृत्यू झाला. परंतु ही घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडली असताना 3 महिन्याचा कालावधी उलटूनही या कुटूंबाला मदत मिळालेली नाही. परंतु याबाबत मॅक्समहाराष्ट्र ने वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर सर्वच यंत्रणेचे धाबे दणाणले असून आता मृत भावेश आईला निधार योजने अंतर्गत पेन्शन चालू होणार आहे.
याबाबतची माहिती तहसीलदार वैभव पवार यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे महावितरणच्या अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गेला भावेशचा बळी या आदिवासींच्या जमिनीतून ही लाईन गेली असताना, या कुटूंबाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच वीज सुरू करणार आहोत याची येथील ग्रामस्थांना पूर्व कल्पना देण्यात आली नाही. गावा बाहेरून लाईन घ्या. असेही येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराला बजावल्याचे होते. पण ठेकेदाराने ग्रामस्थांचे ऐकले नाही, तसेच वीजेच्या लाईनला स्पर्श होणाऱ्या झाडांची छाटणी देखील केली नसल्याने, भावेशचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत भावेशचे मामा सुरेश वांगड यांनी केला आहे. तसेच पुन्हा अशी घटना घडू नये. यासाठी ही लाईन येथून तात्काळ हलवून गावा बाहेरून घ्यावी. अशी मागणी येथील ग्रामस्थांची असताना अद्याप पर्यत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसून जो पर्यत या पीडित कुटूंबाला न्याय मिळत नाही तो पर्यत मॅक्समहाराष्ट्र पाठपुरावा करत राहणार आहे.