स्वयम् सिद्धता आणि व्यक्तिमत्व विकास हा प्रत्येकाच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असतो तंत्रज्ञानाच्या या जगात स्पर्धा वाढत असताना दृष्टीबाधित व्यक्तीसुद्धा आपल्या कर्तृत्वाचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहेत.
याच व्यक्तींना रस्त्याने चालताना काठीच्या सहाय्याने कसे चालवावे, धान्य कसे ओळखावे, भाज्या कशा ओळखाव्या यासह विविध विषयांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी अहमदनगरमध्ये अनाम प्रेम संस्थेच्यावतीने दोन दिवसांच्या स्वयम् सिद्धता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच दृष्टीबाकीत व्यक्तींसह डोळस व्यक्तींना सुद्धा डोळ्याला पट्टी बांधून या सगळ्या गोष्टी ओळखण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
सर्वसामान्य यांच्यामध्ये समतोल रहावा यादृष्टीने एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांना ब्रेल में म्हणून ओळखले जाते असे स्वागत थोरात या कार्यशाळेचे मार्गदर्शक होते. या संपूर्ण कार्यशाळेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.