वर्षाभरापूर्वी अख्खं कुटुंब गेलं, पण तो जवान हरला नाही !

तळीये दरड दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत आई-वडील, पत्नी आणि बहिण गमावलेल्या जवानाने आपली दु:ख दूर सारत देशसेवेला प्राधान्य दिले आहे...एवढेच नाही तर आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करत गावाचे नावही उज्ज्वल केले आहे, त्याची प्रेरणादायी जीवन कहाणी मांडणारा धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट....;

Update: 2022-07-21 14:59 GMT

रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर दरड कोसळून अनेकजण कायमचे ढिगाऱ्याखाली गाडले गेले....अनेक कुटुंबच्या कुटुंब यात उध्वस्त झाली. याच दुर्घटनेत कोंडीलकर कुटुंबातील सर्वजणही जीवानीशी गेले...पण कोंडीलकर यांचा मुलगा एकटा वाचला कारण त्यावेळी तो देशेसेवेचे कर्तव्य बजावत होता... अमोल कोंडाळकर या जवानाने आपले आईवडील, बायको, बहीण सगळ्यांना गमावले. या जवानावर मोठी आपत्ती कोसळली होती. अशाही परिस्थितीत सर्व वेदना मनात ठेवून अमोल देशसेवेच्या कार्यात पुन्हा उतरला....एवढेच नाही तर सैन्यदलात त्यांनी मोठा सन्मानही पटकावला आहे.

अमोल कोंडाळकर याची कहाणी प्रत्येकाला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारी ठरलीय. तळयेचा हा बहादूर जवान भारतीय सैन्यात अव्वल ठरलाय. 150 जणांच्या ग्रुपमध्ये combat enginering instructor या महत्वाच्या कोर्समध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुर्घटनेत गेलेल्या आई वडिलांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्याने व्यक्त केलीय.

अमोल पांडुरंग कोंडाळकर भारतीय सैन्यात 2012 मध्ये भरती झाला होता. अमोलची आई उषा कोंडाळकर या जिल्हा परिषदेच्या शाळेच नोकरीला होत्या. वडील शेती करीत असत. पण 22 जुलै 2021 च्या दरड दुर्घटनेत अमोलने आपले सर्व कुटुंब गमावले. त्यावेळी अमोल पुणे (CME )मध्ये एक कोर्स करीत होता, या दुःखद व हादरवून टाकणाऱ्या घटनेने अमोल सर्व अपूर्ण सोडून घरी आला. पण आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करत अमोलने प्रेरणादायी काम केले आहे. अमोलच्या या जिद्दीला सलाम !

Full View

Tags:    

Similar News