घरची परिस्थिती हलाखीची. गावातील तालमीत असणारे कुस्तीचे वस्ताद उत्तम तात्या यांनी हा मुलगा मल्लखांब शिकेल हे सुतोवाच केले होते. पैसे नाहीत, प्रशिक्षक नाही. ग्रामीण भागात मल्लखांब खेळण्याची सोय नाही या कठीण परिस्थितीत अथर्व देशमुख या तरुणाने मल्लखांब या खेळात प्रावीण्य मिळवलं आहे. त्याचा संघर्षमय प्रवास जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…