Ground Report : जंगलं कमी होत असताना प्राण्यांची सोय करणारा पर्यावरणदूत

Update: 2022-04-08 13:22 GMT

पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानवाढ यामुळे मानवी जीवन धोक्यात आलेले आहे, याला एक महत्त्वाचे कारण ठरले आहे ते जंगलतोड...या जंगलतोडीमुळे प्राण्यांनाही त्रास सहन करावा लागतो आहे.




 


जंगलात अन्न आणि उन्हात पाणीही मिळण्याची सोय नसल्याने अनेक प्राणी मानवी वस्तीकडे येत असतात...पण रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती शेकडो माकडांसाठी आणि पक्षांसाठी दररोज पाणी आणि अन्नाची सोय करत आहे, एवढेच नाही तर स्वत: जाऊन या माकडांना खाऊ घालण्याचे काम करत आहेत.




 


रायगड़ जिल्ह्यातील नागोठणे विभागातील वरवठने गावातील मारुती राणे यांचा पशुपक्षी व प्राण्यांवर असलेला जीव, त्यांच्याशी निर्माण झालेले नाते आणि प्रेम थक्क करणारे आहे. तळपत्या उन्हात पक्षी-प्राण्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने मारुती राणेंनी अनोखी भूतदया दाखवली आहे. तब्बल 7 वर्षांपासून ऊन, वारा, वादळ-पाऊस काहीही असले तरी ते प्राणी व पशुपक्षांच्या अन्न पाण्याची सोय करीत आहेत.


Full View

Tags:    

Similar News