Special Report : फुटपाथवरील ग्रंथालय...पुस्तकांचा खजिना दिवस-रात्र खुला
हातात मोबाईल आले तसे पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली असे सांगितले जाते. अनेक ठिकाणी ग्रंथालयं बंद पडत आहेत, तिथल्या पुस्तकांवर धूळ साचलेली असते. लोक ग्रंथालयांकडे फिरकत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी फिरती ग्रंथालयंही तयार झाली आहेत. पण भिंत नसलेले, फुटपाथवरचे ग्रंथालय, तेही २४ तास खुले आणि मोफत असेल तर? हो हे खरं आहे दोन महिन्यांपूर्वी मुलुंडच्या रंग कौशल्य कट्टयाने असे ग्रंथालय सुरू केले आहे. मुलुंड पुर्व भागात फुटपाथवर सुरू झालेल्या छोट्याशा ग्रंथालयाला आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे.