ऑनलाईन लोन घेताय? मग हा धोका लक्षात घ्या !
सध्या झटपट लोन देणारे अनेक अँप्स निघाले आहेत. सोशल मिडीयावर सुद्धा तुम्ही अशा अनेक जाहीराती पाहिल्या असतील, मात्र हे असले कर्ज घेणं म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो, त्यामुळं कर्ज देणा-या अशा कंपन्यांपासून सावधान, आम्ही असं का म्हणतोय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट..
सोशल मिडियावर झटपट कर्जाच्या अनेक जाहीराती सध्या पाहायला मिळत असून अनेक जण ह्याला बळी पडत आहेत. फक्त आधारकार्डवर लोन, फक्त पँन कार्डवर लोन, विना गँरंटी लोन या जाळ्यात तरूणाई अडकत चालली आहे. लोन देणाऱ्या ह्या कंपन्या कर्जवसूलीसाठी थेट हमरीतुमरीची भाषा करतायत, शिवीगाळ सुद्धा सुरु आहे. असा अनुभव आला आहे औरंगाबादच्या निशांत देशपांडे आणि संदिप कुऴकर्णी यांना....या दोन्ही तरूणांनी प्ले स्टोरवरून एप डाऊनलोड केले आणि या एपवरून प्रत्येकी 5 हजाराचे कर्ज घेतले, 10 दिवसांच्या अवधीत त्यांना ते फेडणं शक्य झालं नाही आणि वसूलीसाठी ससेमिरा सुरु झाला. धमकीचे फोन शिवीगाळ, अगदी सकाळी 6 पासून त्रास सुरु झाला.. हे एप मोबाईलमध्ये घेतांना या एपने त्यांची पुरती कॉन्टँक्ट लिस्टही चोरली आहे.
त्यामुळं तुम्ही कॉल घेतला नाही तर तुमच्या कॉन्टँक्ट लिस्टमध्ये प्रत्येकाला तुम्ही फ्रॉड असल्याचा मेसेज जातोय. फक्त मेसेजेच नाही तर तुमच्या फोटोवर तुम्ही फ्रॉड असल्याचा ते ग्राफीक्स तयार करतात आणि तेही तुमच्या सगळ्या कॉन्टँक्ट्सना पाठवले जाते.. आणि तुम्हाला पुरते त्रासूवून सोडले जाते.. वसूलीची ही नवी पद्धत चक्रावून टाकणारी आणि तितकीच धोकादायक सुद्दा आहे. या सततच्या कॉलने कर्ज घेणाऱ्याला त्रास होतोच, मात्र त्याचे नातेवाईक ज्यांचे नंबर मोबाईलवर आहेत ते सुद्धा या त्रासाला सामोरं जात आहे..याबाबत फसवणूक झालेल्या लोकांनी पोलिसांकडेही धाव घेतली, पोलीसांनी ऐकून घेत चाचपणी सुरु केलीये मात्र असे अनेक अँप ज्यातून अशा पद्धतीची लूट सुरु आहे ते गंभीर आहे, थोड्या पैसांसाठी तरूणाई अटकत चालली आहे, आणि दुर्दैवानं या कर्ज देणा-या अँपवर कुठलेही बंधन दिसत नाहीये हे विशेष....