प्रयोगातून सापडला मार्ग, अर्ध्या एकर शेतीत 30 लाखांचे उत्पादन

अर्ध्या एकरात 30 लाखांचे उत्पादन शक्यच नाही, असं वाटत असेल तर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या प्रयोगाचा वेध घेणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट तुमच्यासाठीच आहे....

Update: 2022-10-30 12:58 GMT

शेती हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. कधी नैसर्गिक संकट, कधी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा शेतीविषयी नकारात्मक दृष्टीकोण तयार झाला आहे. मात्र भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात राजेश कोळवणकर यांनी वेगवेगळे प्रयोग करत हळद लागवडीतून भरघोस कमाईचा मार्ग शोधला.

रायगड जिल्ह्यातील शेतीवर अनेक नैसर्गिक संकटं येतात. पण हळदीचे पीक तग धरुन राहत असल्याचे राजेश पाष्टे यांनी सांगितले. हळदीचे कोणता वाण लावावा हे सांगतानाच अर्ध्या एकर शेतीत 200 किलो बियाणे लावले. त्याच्या माध्यमातून 6 ते 10 मेट्रीक टन उत्पादनाची अपेक्षा आहे. तसेच हळद उत्पादनातून 10 ते 30 लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे राजेश कोळवणकर यांनी सांगितले आहे.

आम्हाला रोहा कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे हा प्रयोग शक्य झाला असल्याचे शेतकरी असलेल्या राजेश कोळवणकर यांनी सांगितले. त्यामुळे भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात प्रयोगशील दृष्टीकोणातून सुरु केलेल्या हळदीच्या उत्पादनाचे कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांनी कौतूक केले.

Tags:    

Similar News