दुध संघावरून जळगावात एकनाथ खडसे आणि भाजप मध्ये पुन्हा वाकयुध्द...

Update: 2022-10-16 09:01 GMT

जळगाव(jalgaon) दुधसंघात एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि परिवार संगनमताने सिंडीकेट चालवत गैरव्यवहार केल्याचे आरोप भाजप(BJP) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी केले. तसेच एकनाथ खडसे यांनी जेल मध्ये जाण्याची प्रॅक्टिस केली अशी टीका केली. त्या आरोपांवर उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी कोण मंगेश चव्हाण मी ओळखत नाही असा पलटवार केला.

जळगाव सहकारी दूध संघाच्या गैरव्यवहारावरून राष्ट्रवादींचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात टोकाचा वाद पेटलाय. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत खडसे परिवार संगतमताने दूध संघात सिंडिकेत चालवत होते कोट्यवधींचा तूप, लोणी, दूध पावडर खाल्लं असा आरोप केला आपल्याकडे सर्व पुरावे आहेत, भर चौकात खडसे आणि मी समोरासमोर येऊन चर्चा करायला तयार आहे खोटं निघाले तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ किंवा खडसेंनी द्यावा असं आवाहन केलं.

मंगेस चव्हाण यांच्य़ा या आरोपाला एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केलाय. मी जेल मधे जाणार कधीच जाणार नाही , काळजी करू नका तुम्ही एक दोन वर्षांपासून माझ्या जेल मध्ये जाण्याची वाट बघताय पण मी बाहेरच राहीन. मी काही गुन्हा केलेला नाही, अपहार केलेला नाही .भर चौकात बोलण्यापेक्षा विधानसभेत मांडा अस प्रति आवाहन खडसेंनी केलं. आता नेमकं कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हे येणारा काळच सांगेल. पण या निमित्ताने जळगावातील राजकीय वातावरण तापलंय यात तिळमात्रही शंका नाहीये.

Tags:    

Similar News