कंगना रणौतच्या वक्तव्याला विक्रम गोखलेचं समर्थन, महाराष्ट्रातील पत्रकारांनी घेतला गोखलेंचा खरपूस समाचार

Maharashtra Journalist reaction on Vikram Gokhale remark on Kangana Ranaut statement leaders never saved freedom fighters during British raj;

Update: 2021-11-17 08:35 GMT

अभिनेत्री कंगना रणौतला नुकता पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते..

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते.

कंगना रणौतच्या या वक्तव्याला विक्रम गोखले आज समर्थन दिलं आहे. आज विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

"खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे. यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी. ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का?"

देश कधीही हिरवा होणार नाही...

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे.

असा सवालही विक्रम गोखले यांनी केला आहे. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आणि शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल. असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान गोखले यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी विक्रम गोखले कायम हिंदुत्ववादी होते.मधल्या काळात त्यांनी ती भूमिका सफाईने लपवली.पण मोदी पंतप्रधान झाल्याने त्यांना नवं च्यवनप्राश मिळालं.आता त्यापुढे जाऊन कंगनाच्या रांगेत उभं रहायची इच्छा व्हावी याला म्हातारचळच म्हणता येईल!

असं ट्वीट केलं आहे.

तर दुसरीकडे मॅक्समहाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी देखील यावर ट्वीट केलं असून त्यांनी

कंगणा राणावत ने आजोबा स्वातंत्र्य सैनिक असल्याचा उपयोग करून कोट्याचा फायदा घेतला होता, असं एका मुलाखतीत म्हटल होतं. सगळे लाभार्थीच आहेत, फक्त भक्तगिरीत आपण किती वरचे याची स्पर्धा आहे ही. विक्रम गोखले ही छोटी आवृत्ती आहे.

असं ट्वीट केलं आहे.

यावर दिल्लीतील Abp माझाचे पत्रकार प्रशांत कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले...

स्वातंत्र्यलढ्याशी आपला काही संबंध सांगता येत नाही ना मग त्या लढ्यालाच बदनाम करायचं! त्याचं महत्त्व कमी करण्याचा अजेंडा दिसतो आहे. ही सगळी अमृतवाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होते आहे आणि असं वक्तव्य करणाऱ्यांना सत्ताधारी विचारसरणी पाठीशी घालते हे दुर्दैव.


साम मराठी मुंबई ब्यूरो चीफ रश्मी पुराणिक यांनी दोन ट्वीट केले आहे. एका ट्वीट मध्ये त्यांनी एक फोटो ट्वीट करत गोखले यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.



दुसऱ्या  ट्वीटमध्ये किती मराठी कलाकारांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा निषेध केला?

बोलणाऱ्यांचं जितकं पाप आहे तितकंच गप्प बसणाऱ्यांचं पण आहे!

असा सवाल देखील त्यांनी  केला आहे.


ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी देखील ट्वीट केलं आहे. त्यांनी विक्रम गोखले हे पूर्वीपासूनच कंगनाच्या एक पाऊल पुढे असलेले गृहस्थ आहेत. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळं काही अपेक्षित नव्हतं आणि नाही !

असं ट्वीट केलं आहे.



एकंदरीत सर्व पत्रकारांनी गोखले यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतल्याचं दिसून येतं.

Tags:    

Similar News