अमेरिकन निवडणूक अध्यक्षपदाची मर्यादा, पहा सुहास पळशीकर यांचे विश्लेषण
अमेरिकन राजकारणात निवृत्तीसाठी काय अट आहे? तुम्ही अध्यक्षीय निवडणूक किती वेळेस लढवू शकता? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे विश्लेषण नक्की वाचा....;
अमेरिकेचे आत्ताचे अध्यक्ष हे ऐंशीच्या घरातले आहेत. पुढच्या निवडणुकीला उभं राहणार असं त्यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जे असणार आहेत ट्रम्प त्यांनी पंच्याहत्तरी पार केलेली आहे. म्हणजे हा लढा जेव्हा होईल अमेरिकेमध्ये त्यावेळेला एक एक्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचा नेता आणि दुसरा सत्याहत्तर वर्षाचा किंवा अठ्ठ्याहत्तर वर्षाचा नेता अशा दोघांमध्ये ती लढत होईल. हे जर लक्षात घेतलं तर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल. राजकारणामध्ये निवृत्तीचं वय सहसा नसतं. फार फार तर अमेरिकेत जसं आहे की अध्यक्ष दोनदा स्वतः येतं. अशा प्रकारच्या काही मर्यादा असतात. भारतात तर त्याही मर्यादा नाहीत.
हे ही वाचा-पासष्ठीत निवृत्त होणारे राजकारणी कोण? पहा सुहास पळशीकर यांचे विश्लेषण