राज ठाकरे का झालेत उद्विग्न?

Update: 2017-09-14 13:16 GMT

दिल्लीजवळ गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायन इंटरनॅशनल स्कूल आणि मुंबईतील इतर शाळांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी अत्यंत उद्विग्न होऊन सर्व शाळांचे विश्वस्त व मुख्याध्यापकांना उद्देशून पत्र लिहिलेले आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलसाठीच्या पत्राची प्रत घेऊन मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, मनसेविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आणि मनसेचे इतर पदाधिकारी १५ सप्टेंबरला कांदिवली पूर्वतील ठाकूर संकुल येथील रायन इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि विश्वस्ताची भेट घेणार आहेत. काय लिहिले आहे राज ठाकरेंनी पत्रात ते पाहा येथे....

Similar News