राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख ‘लोकांची चवळवळ म्हणजे कॉंग्रेस... इतकं विस्तारीत रुप कॉंग्रेसला प्राप्त झालेलं आहे. अनेकांनी प्रयत्न केले कॉंग्रेस संपवायचे ते संपले कॉंग्रेस नाही संपली’ असं म्हणत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ Ashok Chavan The Management Guru या पेजवर वर्षापुर्वीच अपलोढ करण्यात आला असून देशात झालेल्या या पाच राज्याच्या निवडणुकीनंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे.