कंपनीनं नुकतंच याबाबतचं एक टीझर पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. सॅमसंगला जोरदार टक्कर देण्यासाठी शाओमी रेडमी आता 'एमआय मिक्स ३' हा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. तब्बल १० जीबी रॅम आणि ५ जी सपोर्ट असणारा हा फोन असेल. '५ जी' कनेक्टिव्हिटी सपोर्ट असलेला हँडसेट लाँच करणारी शॉओमी ही पहिली कंपनी असणार आहे. याआधी केवळ विवो आणि ओप्पो या कंपन्यांनी स्लायडर कॅमेरा हँडसेट बाजारात आणला आहे.