इडीने श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटी संस्थेच्या माजी व्यवस्थापक मच्छिद्र खाडे याला आज आर्थिक अफरातफरीमुळे अटक केली आहे. श्री रेणुका माता बहुउद्देशीय सहकारी नागरी पतसंस्था ही मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज एक्ट २००२ अंतर्गत नोंदनीकृत असून ती सेन्ट्रल रजिस्ट्रार को ऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्ली यांच्या नियंत्रणाखाली आहे.
यासंदर्भात डी.बी. मार्ग पोलिसस्टेशन मुंबई, द्वारा दाखल केलेल्या एफआय़आरच्या आधारावर मे योगेश्वर डायमंड प्रा.लिमिटेड, मे श्री चारभुजा डायमंड प्रा. लि. व मे. कनिका जेम्स प्रा. लिमिटेड यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालय, मुंबई (ईडी) ने ईसीआयआर नोंद केली होती.
इडीच्या तपासात असं आढळून आलं आहे की, उपरोक्त नामांकित कंपन्यांनी आपआपसात संगनमत करुन इंडसंइड बॅंकेच्या ओपेरा हाऊस शाखेत बनावट बिल ऑफ एन्ट्री (BOE) च्या आधारे, विविध कंपन्यांच्या होंगकोंग येथील खात्यात, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या विविध मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करुन, सुमारे २००० कोटी रुपयांचे चलन विदेशात पाठवले. आतापर्यंत तीन व्यक्ती, श्री अनिल चोखडा (वरील कंपनीचे मालक) संजय जैन (माजी संचालक रधुकुल डायमंड ) आणि सौरभ पंडित (संचालक मे स्काईलाईट आणि मे. लिंक फै. या होंगकोंग स्थित कंपन्या ) यांना ईडीने या संदर्भात अटक केली व सुमारे २० कोटी रुपयाच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले.
मच्छिद्र खाडे याने विविध व्यक्ती व कंपन्या यांच्या नावे विविध खाती उघडून त्यामध्ये मोठ्या रकमा सोसायटीच्या कोअर बॅंकिंग व RTGS आरटीजीएस सुविधा असलेल्या बॅंक खात्यात जमा केल्या. अशा प्रकारे लाभार्थींचे व्यवहार यशस्वीरित्या आरटीजीएस / एनईएफटीद्वारा श्री रेणुका माता बहुउद्देशीय सहकारी नागरी पत संस्थेचे नावे प्रतिबिंबित केले. मच्छिंद्र खाडे हा विविध लोकांशी संपर्क करुन त्यांना आर्थिक लाभ देऊ करुन त्यांना त्यांच्या नावे बॅक खाती उघडण्यास प्रवृत्त करत असे. मच्छिद्र खाडे यांने रिक्त आरटीजीएस स्लिप्स वर खातेधारकांच्या स्वाक्षरी प्राप्त केल्या आणि त्या आपल्या ताब्यात ठेवल्या व त्यामध्ये जरुरी प्रमाणे रक्कम व लाभार्थीचा तपशील भरत असे. तो अशा प्रत्येक व्यवहारासाठी आरटीजीएस टप्यापर्यंत ५० रुपये प्रतीलक्ष कमिशन घेत होता.
तपासात असे आढळले की अशा प्रकारे १२० कोटी रुपये विविध खात्यामध्ये जमा करुन आरटीजीएस / एनईएफटीद्वारे वेगवेगळ्या शेल कंपन्यांना हस्तांतरित केले गेले व शेवटी भारतातून हॅागकॉंग स्थित कंपन्यामध्ये बनावट बिल ऑफ एन्ट्री (BOE) च्या आधार पाठवले गेले. मच्छिंद्र खाडे यांला विेशेष पीएमएलए न्यायालयाने ४ (चार दिवस) दिवसांचे रिमांड दिले आहे.