सध्या देशात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण सरकारच्या बाजूनं खिंड लढवत असून वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. आर्थिक सुधारणा करण्यासाठी आत्ता पर्यंत त्यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यानंतर आज त्यांनी तिसरी पत्रकार परिषद घेतली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हाउसिंग सेक्टर साठी महत्वाची घोषणा केल्या.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सितारमण यांनी हाउंसिग सेक्टरसाठी 10 हजार कोटींच्या निधीची घोषणा केली. हा निधी 60 टक्के पूर्ण झालेल्या आणि निधी अभावी अडकून पडलेल्या घरांसाठी दिला जाणार आहे. फक्त यामध्ये घरांचा प्रकल्प एनपीए असावा.
सरकार घर खरेदी करण्यासाठी विशेष खिडकी योजना आमलात आणणार असून यातून लोकांना घर खरेदीसाठी मदत करण्यात येईल. यामध्ये एक्सपर्ट लोकांचा समावेश असणार.
निर्यात क्षेत्राला बुस्ट
निर्मला सितारमण यांनी निर्य़ात क्षेत्राला बुस्ट देण्यासाठी निर्यात करण्यासाठी लागणार वेळ कमी व्हावा म्हणून पावलं उचलली जाणार असल्याचं सांगितलं. निर्यात क्षमता वाढवण्यासाठी 36 ते 38 हजार कोटी निधी दिला जाणार.
मर्चन्डाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडियन स्कीम 1 जानेवारी पासून समाप्त करण्यात येईल. त्या ऐवजी RoDTEP ही स्किमएक जानेवारी पासून लागू करण्यात येणार आहे. नवीन RoDTEP मुळे 50 हजार कोटीचा फायदा होणार आहे.
वार्षिक मेगा शॉपिंग फेस्टिवलचं देशात पूर्ण चार जागेवर आयोजन करण्यात येणार आहे. हे आयोजन मार्च 2020 पासून सुरु होणार... यामध्ये हिरे - दागिने, योगा आणि पर्यटन, टैक्सटाइल्स त्याबरोबरच चामड्याच्या क्षेत्रात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार.
निर्यात वाढवण्यावर सरकारचा भर असणार असून जुन्या आरओएसएल डिसेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार. वैयक्तिक लाभ जनतेपर्यत पोहोचत आहेत. औद्योगिक उत्पादन आणि स्थिर गुंतवणूक वाढण्याचे संकेत मिळत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ई असेसमेंट स्कीम दसऱ्या पासून सुरु केली जाणार. ही योजना पुर्णपणे ऑटोमॅटीक आहे.
पार्शल क्रेडिट गारंटी स्कीमची घोषणा करण्यात आली असून या योजनेमुळे बॅक आपल्या संपत्तीत वाढ करु शकते. 19 सप्टेंबरला आपण देशातील सरकारी बॅंकांच्या प्रमुखांशी या संदर्भात भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितले.