राज्यभर सुरु असलेल्या मराठा आरक्षणावर लवकरच निर्णय होईल, लोकांनी हिंसाचार करू नये, असा संदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला दिला. सरकारने लवकरच निर्णय घ्यावेत नाहीतर उद्रेक होईल. मराठा समाजाच्या आंदोलकांना नक्षलवादी होण्याची वेळ आणू देऊ नका, असा इशारा सरकारला देण्यात आला. राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. जीव देणारे, जीव घेतील इशारा सरकारला दिला.