पुणे नाशिक महामार्गा वरती खड्याने आणखी एक बळी घेतला आहे. श्रावणी सोमवार निमित्ताने ज्योर्तिंलिंग भिमाशंकरच्या दर्शनासाठी चाललेल्या भाविकाचा पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथे खड्डा चुकवता अपघात मृत्यू झाला आहे. टु व्हिलर आणि मालवाहतुक ट्रक यांच्यात हा अपघात झाला असून टु व्हिलर वरील विठ्ठल चव्हाण हे ४० वर्षीय भाविक खड्डा चुकवत असताना मालवाहतुक ट्रकच्या पाठीमाघील चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर टु व्हिलरवरती पाठी बसलेल्या अमोल डुकरे यांची ही प्रकृती गंभीर आहे. पुणे नाशिक महामार्गावरील माघील चार दिवसातील खड्याने घेतलेला हा दुसरा बळी घेतला आहे. ३१ ऑगस्टला याच पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर येथील चांडोली फाट्या वरती अनिल गायकवाड या २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता आणि आता पुन्हा एका व्यक्तीचा खड्याने बळी घेतला असून प्रवाशी महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर भरण्याची माघणी होत आहे.