अखंड भारतात संघ-भाजप सत्तेत येईल का ?

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत नेहमी अखंड भारत करण्याविषयी भाष्य करतात. पण अखंड भारताचे स्वप्न शक्य आहे का? अखंड भारत ही संकल्पना सत्यात उतरलीच तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप सत्तेत येईल का? याविषयी विश्लेषण केले आहे लेखक आनंद शितोळे यांनी...;

Update: 2022-04-15 14:28 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर भागवत काकांनी अखंड भारताची ललकारी दिली आणि सगळे झेलकरी पिचक्या पिपाण्या, फुटके ढोल आणि बेसूर चिपळ्या, तुणतुणे घेऊन झेल धरायला धावले. त्या समस्त झेलकरी झेले अण्णा लोकांसाठी.

अखंड भारत आणि हिंदुराष्ट्र या एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या संकल्पना आहेत.

तेव्हा आधी भागवत काकांना जाऊन नीट विचारून घ्या, तुम्ही आम्हाला नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मुर्खात काढणार आहात.कारण तुम्ही मुर्खात निघालेले आहातच, फक्त कुठल्या गाजराची पुंगी वाजवून तुम्हाला मुर्खात काढलेलं एवढ तरी तुम्हाला समजायला हवय.

तर या अखंड भारताच्या पिपाणीमागच नेमक सत्य.

  • भारताची लोकसंख्या १३५ कोटी, खासदार ५४३ म्हणजे सरासरी २५ लाख लोकसंख्येला एक खासदार.
  • पाकिस्तानची लोकसंख्या २१ कोटी, त्यांचे खासदार होतील ८४ .
  • बांगलादेश १५ कोटी, त्यांचे खासदार होतील ६० खासदार .
  • भारतातले मुस्लीम १५ टक्के धरा, ते खासदार होतात ८१ .
  • पाकिस्तानात मुस्लीम ९७ टक्के, बांगलादेश मध्ये ९० टक्के.

२२५ खासदार मुस्लीम लोकसंख्या निवडून देणार असेल तर उरलेल्या भारतातल्या ६० टक्के मतदारांनी तुमच्या बुडावर आधीच ढेकूळ ठेवलेला आहे. म्हणजे भारतातले विरोधी मत आणि पाकिस्तानी बांगलादेशी खासदार यांची बेरीज केली तर काकाजी आणि भागवत काकांचा संघ कधीही सत्तेत बहुमतात येऊ शकणार नाही.

मग अखंड भारताचे हिंदुराष्ट्र होणार तरी कसे ?

अखंड भारतात पाकिस्तान बांगलादेश ची जमीन, पाणी , नैसर्गिक संपत्ती आणि भूमी पाहिजे पण लोक नकोत अस चालेल का ?

घडीभर तुमच्या माथेफिरू डोक्यानी या ३६ कोटी लोकांना हाकलून लावायचं ठरवल तर ते शेजारी कुठल्या देशात जातील ? रशिया ? चीन कि अफगाणिस्थान कि अमेरिकेत ? मग काय एवढ्या लोकांना छळछावणीत पाठवणार का ? असला अगोचरपणा केला तर जागतिक पातळीवर इतके निर्बंध आणि इतका मोठा तेल लावलेला दांडू लागेल कि अंगावरची कापड सोडा कमरेला करगुटा सुद्धा उरायचा नाही.

रशिया आणि युक्रेन भानगडीत अमेरिकेने निर्बंध लादून किती घाईला आणलेलं आहे हे दिसतय ना ? आपल्याला सुद्धा रशियन तेल विकत घेण्याचा निर्णय माघारी फिरवायची नामुष्की आलेली आहे.

पाकिस्तान,श्रीलंका चीनसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे देश आहेत, ते इतक्या सहजासहजी हातातून जाऊ द्यायला चीन वेडा आहे का ?

आधी अरुणाचल, लडाख मध्ये कित्येक किलोमीटर आत घुसून चीनी गाव वसवली गेलेली आहेत त्यावर उपाय करायचा सोडून या अखंड भारताच्या गमज्या कराव्यात कशाला ?


ना अखंड भारत शक्य आहे, ना हिंदुराष्ट्र शक्य आहे.

या दोन्हीही एकमेकांच्या नेमक्या विरोधात असलेल्या गोष्टी तुमच्यासारख्या माठ आणि मंदबुद्धी लोकांना च्युतात काढायला बनवलेली हत्यार आहेत.

या पिचक्या पिपानीच्या नादी लागण्यापेक्षा कालच्या दिवशी ज्यांची जयंती होती त्यांनी दिलेलं संविधान लक्षात घ्या, सगळ्यांना दिलेले समान हक्क आणि नागरिकत्व लक्षात घ्या आणि शहाण्या माणसासारखे आपापल्या कामधंद्याला लागा.

सलग दोन टर्म , पूर्ण दहा वर्षे संपूर्ण बहुमत मिळूनही आर्थिक आघाडीवर आलेल पूर्ण अपयश, महागाई, इंधनाचे, सिलिंडर आणि सगळ्याच गोष्टीचे आभाळाला भिडलेले भाव, वाढलेली बेरोजगारी, बुडालेल्या बँका आणि विकून टाकलेल्या सरकारी कंपन्या हे सगळ घेऊन लोकांपुढे पुन्हा मत मागायला जायची आपली कुवत नाही, नीट निवडणुका झाल्या तर लोक आपल्याला पुन्हा दोन अंकी खासदारांचा पक्ष करून ठेवतील हे नीट ठाऊक असल्याने हि गाजराची पुंगी पुन्हा वाजवायला काढलेली आहे एवढच सत्य.

भागवत काकांची अखंड भारताची ललकारी म्हणजे काकाजींच्या अपयशाची स्पष्टपणे दिलेली कबुली आहे.

आनंद शितोळे

Tags:    

Similar News