यांत्रिक ठोकताळ्याच्या चिमटीत न येणारा चीन

चीन बद्दल केलेले भाकीत सतत खोटे का ठरतात? कम्युनिस्ट चीनमध्ये भांडवालशाही सुधारणा करेल असं वाटलं नसताना चीन भांडवली सुधारणा कशा स्विकारल्या? तयार झालेला मोठा मध्यमवर्ग पाश्च्यात लोकशाहीसाठी पुढाकार घेईल. अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, तसं का झालं नाही? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी चीन संदर्भात केलेले विश्लेषण;

Update: 2021-08-24 02:56 GMT

१९४८ : ज्यावेळी मार्क्सने असे भाकीत केले होते कr समाजवादी क्रांती औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या देशात होईल; त्यावेळी शेतीप्रधान असणाऱ्या चीनने समाजवादी क्रांती करून दाखवली.

१९७८: क्रांतीनंतर ३० वर्षे कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर असल्यानंतर कोणाच्या स्वप्नात नसतांना चीनने भांडवलशाहीतील काही प्रमेयानुसार आर्थिक सुधारणा राबवल्या.

१९९२: कम्युनिस्ट चीन जागतिक भांडवलाचा जागतिकीकरणाचा अजेंडा राबवणार नाही. असताना चीन स्वतः जागतिक व्यापार संघटनेत सामील झाला. चीनने अर्थव्यस्वस्थेचा वेग वाढवला.

१९९४: सार्वजनिक क्षेत्राचे प्राबल्य कमी करणे, आर्थिक धोरणे पूर्णत्वाने बाजार शक्तींच्या हाती सोपवणे होईल. अशी आशा बाळगून काही मंडळी होती. तसे काही झाले नाही.

२०००: देशात तयार झालेला मोठा मध्यमवर्ग पाश्च्यात लोकशाहीसाठी पुढाकार घेईल. अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण तसे काही झाले नाही.

२००८: मधील जागतिक वित्तीय / आर्थिक अरिष्टात चीनच्या अर्थव्यस्वस्थेचा डोलारा कोसळेल असे भाकीत केले जायचे पण तसे काही झाले नाही.

२०१६: डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध व्यापारी युद्ध छेडले; चिनी आयात-निर्यातीवर बंदी घातली; त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल; पण नाही झाला.

२०१९ : चीनची अर्थव्यवस्था आता मंदावेल असे वाटतं असताना, चीनने ७५ कोटी लोकसंख्येला दारिद्र्य रेषेबाहेर काढून देशांतर्गत बाजारपेठेचे सखोलीकरण केले

२०२०: कोरोनाचे "चायनीज व्हायरस" केलेले वर्णनं जगभर चीनविरुद्ध वातावरण तापवेल; पण वाटले होते तेवढे तापले नाही

२०२१: चीनमध्ये वाढणारी आर्थिक विषमतेमुळे चीनमध्ये आता नावाला समाजवाद उरला आहे; बाकी मूठभर श्रीमंतांचेच राज्य आहे असे वर्णन केले जायचे

क्षी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या महाबलाढ्य कोर्पोरेट्सना चाप लावला जात आहे; काही व्यक्तींच्या श्रीमंतीपेक्षा "सामुदायिक समृद्धी" (कॉमन प्रॉस्पेरिटी) महत्वाची आहे. असे सांगून चीनमध्ये बरेच काही घडू पहात आहे.

संजीव चांदोरकर

(लेखक : संजीव चांदोरकर अर्थतज्ज्ञ आहेत. त्याचबरोबर फेसबुकवर आर्थिक घडामोडींवर लिहितात.)

Tags:    

Similar News