मस्तकातला बर्ड फ्लू

बर्ड फ्लू म्हटलं की अंडी खायची नाही... असा गैरसमज लोकांच्या डोक्यात कुणी पसरवला? बर्ड फ्लू म्हणजे काय? आणि अंडी-चिकन यांचा बर्ड फ्लू रोगाशी काय संबंध? विज्ञान आणि अज्ञान नेमकं काय सांगतो? जाणून घ्या सुधाकर सोनवणे यांच्या लेखातून...;

Update: 2021-04-23 09:39 GMT

सुधाकर सोनवणे, बीड

अंडी-चिकन आहारात आवश्यकच.70 अंश सेंटिग्रेड तापमानावर ते शिजवून खाल्ल्यास धोका नाही पण गैरसमजाचा मस्तकात बसलेला बर्ड फ्लू काढणार कोण?

कोरोनात बर्ड फ्लूच वादळ शमलं हे सत्य. पण, बर्ड फ्लू म्हणजे काय? त्याबद्दल अपवाद वगळता सर्वांचे अज्ञान. विज्ञान आधारे आहारशास्त्र प्रमाणे काय खावे हेही आपल्याला माहित नसते. त्यासाठी सरकारला पुढाकार घेऊन अंडे खाण्याची जाहिरात करावी लागली. 'आवो सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा, ये नहीं प्यारे है कोई मामुली बंदा... इसमे छुपा है जीवन का फल सफा' हे गीत त्यासाठी भारतभर प्रसिद्ध.

गरोदर मातामध्ये एच.बी आणि हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे अंडे शिजवून खाण्याचा तज्ञांचा सल्ला. पण ऐकतंय कोण? त्यामुळे राज्यात वाढलेले गरोदर माता आणि बालमृत्यूचे प्रमाण भयंकर. ऐकीव गोष्टीवर भरोसा ठेवल्यावर स्वतःचे आणि समाजाचे नुकसान होत असते. कोविड काळात अंडी-चिकन खाण्याचे जवळपास सर्वांनीच बंद केले. याचा परिणाम तसा गंभीर. त्यामुळे, स्वतःच्या शरीराचे आणि तो उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. आता प्रश्न हा आहे की, अंडे, चिकन महत्त्वाचे की,शेतकरी व्यवसायिक महत्वाचे? की आपण? हे पाहणे क्रमप्राप्त.

जगात सर्व क्षेत्रात प्रथम असणाऱ्या चीनसह साऊथ कोरिया, अमेरिका, युके मध्ये घराघरात आहारामध्ये अंडी खातात. जागतिक स्तरावर या देशांचा संशोधनास उत्पादन, निर्यात आणि वर्चस्व क्षेत्रात दबदबा आहे. हे कुणालाही मान्यच करावे लागते. पण जगभरातले औद्योगिकरणकर्ते आणि धोरणकर्ते स्वतः सह त्यांच्या वर्तुळातील जग जवळ करण्याच्या भानगडीत कायमस्वरूपी पडल्यामुळे त्याचा परिणामकारक परिणाम सर्वांना धोक्यात घालून सामाजिक पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण नष्ट करण्याचा मतलबी पणा सर्वांसाठी घातक. तसे ते कुठल्याही बदलाला हानिकारकच. भारतात केंद्रीय व पर्यावरण मंत्रालयाने बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या अध्यक्षतेखाली पक्षी आणि मोबाईल टॉवर्स प्रकरणात केलेल्या सर्वेक्षणानुसार तो अहवाल हा की, मोबाईल टॉवर द्वारा प्रसारित विद्युत चुंबकीय किरणे यामुळे पक्षी आणि मधमाशी मृत पावतात. या अहवालाचे पुढे काहीच झाले नाही. तसेच बर्ड फ्लूचे ही काही होणार आहे का?

मुगगाव ता. आष्टी जी. बीड येथे काही दिवसापूर्वी १२ कावळे मृत अवस्थेत आढळले. त्याचा मागोवा घेताना पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या बरोबर चर्चा झाली. चर्चेअंती प्रथमस्थळी मृत पावलेल्या कावळ्यांचे अहवाल भोपाळ आणि पुणे येथे पाठवल्यानंतर आलेल्या अहवालावरून आपण बातमी प्रकाशित करा असे त्यांचे मत. चर्चेमध्ये सबुरीचे डॉक्टर चौरे यांनी दिलेला सल्ला हा की, आत्ता तुम्ही बातमी प्रसारित केली तर शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून जे शेतकरी कुक्कूटपालन व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होईल. त्यांचे मत तसे योग्यच.

दरम्यान त्या वृत्ताला स्थगिती दिली. त्यानंतर तीन दिवसांनी बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांनी ते वृत्त प्रसिद्ध आणि प्रसारित केले. यामुळे कुकुट पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ते असे की, बर्ड फ्लूच्या बातमीनंतर लोकांनी चिकन आणि अंडी खाणे बंद केले म्हणून आणि त्याचा परिणाम त्या उत्पादकाला झाला म्हणून.

बरं, बर्ड फ्लू म्हणजे काय? हे माहीत नसताना लोकांनी तसे कृत्य करणे हे अज्ञानाचे लक्षण. त्यांच्या माथी बर्ड फ्लूची भीती दाखवणारे माध्यमही तसे जबाबदार. बर्ड फ्लू म्हणजे, एच व्ही एन. पक्षांमधील हा झुनॉटिक विषाणू भारतामध्ये सर्वप्रथम 2005 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात येथे आला. दरम्यान हा संसर्ग विषाणू देशातील अनेक राज्यात पोहोचला. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार या संसर्गजन्य विषाणूचा अपप्रचार जास्त झाला, ते खरेच.

एकीकडे महाराष्ट्रात आणि देशात नागरिकांना सशक्त होण्यासाठी अंडी आणि मांस खाणे यासाठी प्रचार आणि प्रसिद्धी केली जाते. अंडे आणि मांस खाल्ल्यावर व्यक्ती तंदुरुस्त(सशक्त) राहते असा आरोग्य विभागाचा दावा. ते बरोबर आहे. आपल्याकडे अज्ञानातून आणि गैरसमजातून हे खाद्य वर्ज केले जातात हेही खरेच. पण त्याला आधार काय? गैरसमज आणि अफवा यामधून हे सारे घडते. विकसित देशांमध्ये असे घडत नाही. विकसित देशातील लोक विज्ञानाला ग्राह्य धरत आहार आणि व्यवहार करतात. ते परंपरेला खतपाणी घालत नाहीत. भारत देशात रुढी, परंपरा, याला सर्वाधिक महत्त्व आहे. विज्ञानाची कास धरण्यात तसे आपण मागेच. देशाचा आणि जगाचा सर्व विकास विज्ञानाच्या आधारावर झाला असला तरी आपण तसा कृती कार्यक्रम करत नाहीत. मग याला बर्ड फ्लू ही अपवाद नाही.

बर्ड फ्लू हा एवढा घातक नाही. त्यापेक्षा चिकन आणि अंडी 70 डिग्री सेल्स उकळून खाल्ल्यानंतर मानवी शरीरामधील ऊर्जा वाढते. आरोग्य तज्ञाच्या निर्देशानुसार भारतीय लोकांनी अंडी आणि चिकन खाल्ले पाहिजे. यासाठी मोठा आग्रहही केला जातो. यात सरकारचीही मोठी भूमिका आहे. भारतीय नागरिकांच्या शरीरामधील पल्प असणाऱ्या घटकाला अंडी आणि चिकन आवश्यक असल्यामुळे सरकार कडून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला. त्यावर चित्रपटातूनही प्रकाश टाकण्यात आला. 'आओ सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा, ये नही प्यारे कोई मामुली फंडा' हे गीत त्यासाठी प्रसिद्ध. पण कितीही समजून सांगितले तरी ऐकणार कोण?

आता या समस्येवरील उपाय बघण्यापेक्षा ही समस्या आहे का? कि मानसिक समस्या आपल्या लोकांना लागली हे पाहणे क्रमप्राप्त... बर्ड फ्लू म्हणजे पक्ष्यांचा आजार, भारतामध्ये अनेक प्राणी पशुपक्षांच्या प्रजाती नामशेष आहेत. यात पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या हे कुणालाही नाकारता येणार नाही. दुसऱ्या फळीतल्या पिढीने चिमण्यासह अनेक पक्षी आपल्या आयुष्यात अनुभवले. त्यामधील चिमणी हा प्रमुख पक्षी. दळण करताना चिमणी पक्षी हाकलण्याचे काम दुसऱ्या पिढीत केले. पण आज चिमणी दिसत नाही हे खरेच. त्याला कारण, पिकावरील कीटनाशक औषध फवारणी असले तरी संदर्भ आपल्याशीच

जुळतो.

ध्वनिलहरी यामुळे पशुपक्षी मृत पावतात असा दावा आहे. त्यात अजून कुणाचेही शास्त्रीय संशोधन दावा करत नाही. इंटरनेट क्षेत्रामध्ये चीन मधल्या तीन कंपन्या अनेक वर्षापासून जगावर वर्चस्व गाजवत आहेत. त्यानंतर साऊथ कोरिया, अमेरिका, यूके मधील कंपन्यांचे आकाशी भ्रमण आहे. आकाशी ब्रम्हांड करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या जगातील सर्वाच संशोधकांमध्ये विज्ञान आधारित, भारतासह महाराष्ट्र व्यवस्थेने विचार करायला हरकत नाही. डोक्यामधला बर्ड फ्लू निघाल्यानंतर आपत्तीवर विजय मिळवता येतो हे समजून घेणे क्रमप्राप्त.

सुधाकर सोनवणे, बीड

Tags:    

Similar News