समाजाने मला चुकीचं सिद्ध केलं: रवीश कुमार

हिंदी पट्ट्यातील तरुणांबाबत रवीश कुमार का चिंतीत आहे. रवीश कुमारला देशातील सांप्रदायीक वातावरणाबाबत काय वाटतं? वाचा एनडीटीव्हीचे पत्रकार रवीश कुमार यांचा विचार करायला लावणार लेख;

Update: 2022-05-01 09:26 GMT

मी माझ्या प्राइम टाइमच्या अनेक कार्यक्रमात ''ते' तुमच्या मुलांना दंगलखोर बनवत आहेत''. असं सांगत होतो. मात्र, तेव्हा मला विश्वास होता की, प्रत्येक आई-वडील आणि तरुण मुलं इतकी स्वार्थी तर नक्कीच असतात की ते त्याचं स्वतःचं आयुष्य वाया घालवणार नाहीत. दंगलखोर होणार नाहीत पण समाजाने मला चुकीचं सिद्ध केलं आहे. खरं तर असं होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण, राष्ट्र आणि धर्म अभिमानाच्या गोष्टी सांगत द्वेषाची विचारसरणी आदर्श म्हणून प्रस्थापित केली गेली आहे. खरं तर, यांचे दोन प्रकारचे समर्थक असतात. रस्त्यावर उतरणारे अति सक्रिय समर्थक, सोशल माध्यमातून समर्थन करणारे सक्रिय समर्थक, यांच्या बरोबरच समाजीक कार्यक्रमामध्ये भाग घेणारे घटक... आता या लोकांची सामाजिक ओळख इतकी वाढली आहे की, कोणीही त्याला बळी पडून दंगलखोर बनू शकतो. आणि हे केवळ एका धर्मासाठी नाही. तर सर्व धर्मांसाठी आहे.

अयोध्या आणि गोरखपूरच्या घटनांमध्ये तुम्ही हे पाहिलेले आहे. अत्यंत सुशिक्षित आणि शांत मनाचा व्यक्तीही याला बळी पडू शकतो तसेच काही मानसिक आजार असलेला व्यक्ती देखील हत्यार उचलू शकतो. पण, आता त्याचा विस्तार इतका वाढला आहे की, या प्रलयाला थांबवणे कठीण झाले आहे.

विशेषतः हिंदी प्रदेशातील तरूण मुलांना थाबवणं कठीण झालं आहे. आता ही मूलं याचा आनंद घेऊ लागले आहेत. याच कारणामुळे वेळोवेळी धर्माचे मुद्दे उपस्थित केले जातात. जेणेकरून जो समाज तयार केला गेला आहे. तो वेळोवेळी या मुद्यांसाठी आवाज उठवेल. त्यांना एक दिवसही आराम दिला जात नाही. कारण, त्याची रूपरेखाच अशा पद्धतीने तयार केली जाते की, जो कोणी येईल त्याला दुसऱ्या कोणत्या विषयाचा विचार करायची संधी मिळायला नको.

'काश्मीर फाईल्स' चा वाद संपला नाही तर, लगेचच यात्रेवरून वाद निर्माण झाला. यात्रेसंदर्भातला वाद संपला नाही तर लाऊडस्पीकरवरून मारामारी सुरू झाली. गेल्या सात वर्षांत लोकांची इतकी फसवणूक झाली आहे की आता दंगल घडवून आणण्यासाठी काही नवीन विचार करण्याची गरज नाही. तिच जुनी पद्धत जी शंभर वर्षांपासून चालत आलेली आहे. लाऊडस्पीकरून वाद पेटवणे आणि मंदिर-मशीदीं समोर मांस फेकणे. धार्मिक ग्रंथांची विटंबना करणे. मात्र, अजूनही लोक यावर प्रतिक्रिया देतात आणि असं काही झाल्याने दंगल होऊ शकते यावर विश्वास ठेवतात. याच मूर्खपणाशी लढणं आता अशक्य झालं आहे.

आणखी एक पॅटर्न आहे. धर्मावरून सुरू असलेल्या या युद्धात तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही धार्मिक युद्धात आहात, धर्मासाठी युद्ध करत आहात. लढणं म्हणजेच धर्म जाणून घेणं आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. धर्माच्या नावाखाली लहान मार्ग निवडणाऱ्यांनी आता हे समजून घेतले पाहिजे की द्वेषाचे मुद्दे धर्माचा अभिमान प्रस्थापित करत नाहीत. जर तुम्हाला धर्माची खरोखरच काळजी असेल तर त्यांचा अभ्यास करा. असे कितीतरी सुंदर ग्रंथ आहेत, ज्याचा अभ्यास करून तुम्हाला समृद्ध वाटेल. पण, त्याऐवजी लोक फक्त लढण्याचे निमित्त शोधत आहेत. आशा आहे की तुम्ही द्वेषापासून दूर जाण्याचा प्रयत्न कराल.

अयोध्येत दंगल घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात तरुणांबाबत दैनिक भास्करने

https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/news/investigation-of-meat-throwing-in-ayodhya-mosques-mission-to-incite-riots-from-230-pm-to-230-pm-129743692.html

सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. सर्व तरूण सामान्य घरातील आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना त्यांच्या पालकांची काळजीही नाही. ते बेरोजगार आहेत किंवा कमी कमावणारे आहेत. परंतू रागाने भरलेलं आहेत.

दरम्यान, महेश कुमार मिश्रा मास्टर माईंड असल्याचे सांगितले जात आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तात महेश कुमार मिश्रा या अगोदर जागतिक हिंदू संघटना आणि बजरंग दलाशी संबंधित होता. पण नंतर त्यांनी हिंदू योद्धा संघटना स्थापन केली. दैनिक भास्करने ब्रिजेश पांडे, विमल पांडे, नितीन कुमार, प्रत्युष श्रीवास्तव, दीपक कुमार गौर आणि शत्रुघ्न प्रजापती यांच्या घरी आणि परिसरात जाऊन अनेक लोकांशी संवाद साधला आहे.

ही बातमी वाचून वाईट वाटलं. देशाला दंगलखोर बनवलं जात असल्याचं माझं म्हणणं खरं ठरत आहे. मला वाटलं होतं की, मी चुकीचा ठरेल. या द्वेषातुन बाहेर पडणं सोप्पं नाही. डीजे म्युझिकचा वापर तरुणाईला आनंद देण्यासाठी, शक्तीचा अनुभव देण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे गर्दीतील तरुणाईला काहीतरी करून दाखवण्याचे सौंदर्य जागृत होते. त्यांना वाटू लागलंय की ते, स्वाभिमान प्रस्थापित करून भारताला 'सोनेकी चिडीया' बनवण्यासारखे महान कार्य करत आहेत. धर्माच्या अभिमानाच्या नावाखाली हिंदी राज्यातील तरुणांनी हाच मार्ग निवडला असेल तर काय करणार? आणखी एकदा मी सांगू शकतो आणि म्हणू शकतो की द्वेषाच्या मार्गावर जाऊ नका.

रवीश कुमार

Tags:    

Similar News