देवेंद्र फडणवीस नॉर्मल भाषण का करत नाही?
देवेंद्र फडणवीस अन्य नेत्यांसारखं नॉर्मलपणे भाषण का करत नाहीत? एक वेगळ्याच पद्धतीचा हेल काढत ते जोरजोरात का रेकत असतात? फडणवीसांच्या भाषणशैलीवर विश्लेषण केलं आहे, लेखक रवींद्र पोखरकर यांनी...
देवेंद्र फडणवीस अन्य नेत्यांसारखं नॉर्मलपणे भाषण करीतच नाहीत.एक वेगळ्याच पद्धतीचा हेल काढत ते जोरजोरात रेकत असतात.एखाद्या दिवशी असेच रेकत असताना कोसळायचे ते स्टेजवर अशी भीती तो सगळा प्रकार पाहताना आपल्यालाच वाटत राहते.त्यांचे भाषण होणार असेल तर एखादा तज्ञ् डॉक्टर भाजपने स्टेजवर उपलब्ध ठेवावा अशी माझी खरंच मनापासून सूचना आहे.
काल त्यांनी राणा भीमदेवी थाटात आवेशात सांगितलं कि होय,बाबरी पडायला मीही अग्रेसर होतो,त्या सगळ्या विध्वंसात मीही सहभागी होतो,भाजपच्या बत्तीस नेत्यांवर बाबरी पडल्याचा आरोप होता आणि त्यात शिवसेनेचा एकही नेता नव्हता.
फडणवीस साहेब,जेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा तुम्ही नामर्द,पळपुट्या लोकांनी कारवाईच्या भीतीने त्या विध्वंसाची जबाबदारी घेणे नाकारलेत. अडवाणींसह अन्यही काही भाजपच्या नेत्यांनी म्हटलं कि,आम्ही नव्हतो ते..घुमटावर बहुदा शिवसैनिक होते..त्यांनी बाबरी पाडली.बाळासाहेबापर्यंत ते स्टेटमेंट पोहचल्यावर ते तात्काळ म्हणाले कि "जर बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे."
आनंद दिघे यांनी बाबरी पतनाचा फोटो असलेले एक कॅलेंडर तातडीने प्रकाशित केले होते.त्यावर बाळासाहेबांचे वरील वाक्य आणि त्यांचे छायाचित्र ठळकपणे छापलेले होते.त्या कॅलेंडरवर बंदी आणून तत्कालीन राज्य सरकारने त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता.
न्यायालयीन कामकाजात भाजपच्या एकाही नेत्याने,पदाधिकाऱ्याने अखेरपर्यंत बाबरी पतनाची जबाबदारी स्वीकारली नाही.एकही रामभक्त भाजपेयी निधड्या छातीने कोर्टात असं सांगण्यास धजावला नाही कि,"होय,बाबरी पाडण्यात मी सहभागी होतो.त्यासाठी न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य आहे.." आणि आता न्यायपालिका नियंत्रणात घेतल्यावर फडणवीस तारस्वरात सांगताहेत कि होय,मी तिथे होतो..त्या कांडात सहभागी होतो..
खरंतर धर्मांधता कोणाचीही मला मान्य नाही.पण केवळ तथाकथित हिंदुत्वाचा विचार केला तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नखाचीही सर ना तेव्हाच्या भाजपवाल्यांमध्ये होती..ना आत्ताच्या.. हे सगळे साले एकजात गांडू..षंढ.. जमावाने,झुंडीने एखाद्या मुस्लिम मुलीला जोर दाखवणारे..शेकडोंच्या संख्येने जाऊन एखाद्या मशिदीची नासधूस करणारे किंवा तिच्यावर भगवा फडकावणारे..
धर्मासाठी फासावर जाण्याची वेळ आली तर यांच्यापैकी एकही जण ना बाबरीच्या वेळी पुढे आला होता.. ना यापुढेही कधी येईल..