भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात? राहुल बोरसे
महिला अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या सोलापूर ग्रामीण अध्यक्षाचा राजीनामा घेण्यात आला, यापूर्वी अनेकदा भाजप पदाधिकाऱ्यांवर बलात्कार आणि महिला अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर भाजपने कसे समर्थन केले होते याचा लेखाजोखा घेतला आहे अभ्यासक लेखक राहुल बोरसे यांनी..;
उत्तरप्रदेश उन्नाव येथील बलात्काराची घटना - बलात्कार करणारा भाजप आमदार, पीडिता तक्रार द्यायला गेली असता तिची तक्रार न घेता तिच्या वडिलांना मरेपर्यंत मारहाण , तुरुंगात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू. कित्येक दिवस आरोपी कुलदीपसिंग सेंगर याला अटक नाही. जनतेचा दबाव वाढल्यावर दबाव. पुढे भाजप आमदार असलेल्या आरोपीने पीडितेवर ट्रक घालून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेच्या नातेवाईक आणि वकिलाचा मृत्यू.
उत्तरप्रदेश भाजप नेता स्वामी चिन्मयानंद वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला नागडे होऊन मालिश करायला लावत होता. अनेक दिवस पोलिस त्याला अटक करत नव्हते. मुलीने जीवाची बाजी लावून त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती. मात्र भाजप सरकारने त्या मुलीलाच ब्लॅकमिल करण्याचा आरोप करत अटक केली.
जम्मू कुठूआ बलात्कार प्रकरण - आठवर्षीय मुलीचा मंदिरात अमानुष बलात्कार केला गेला. वेळोवेळी तिला नशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केला. काही दिवसांनी तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. देशभरात रोष वाढत असतांना. भाजप नेत्यांनी आरोपींच्या समर्थनात तिरंगा झेंडा घेऊन मोर्चा काढला, त्यात भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
मेघालयचे माजी राज्यपाल भाजप नेते वी षण्मुगनाथन यांनी राज्यपालपदी असतांना राज्यपाल भवनला लेडीज क्लब बनवलं होतं अशी तक्रार खुद्द कर्मचाऱ्यांनी केली. त्यांच्यावर यौन शोषणाचे आरोप झाले ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर पुढे काय कारवाई झाली? याची काहीही माहिती उपलब्ध नाही.
मध्यप्रदेशचे RSS आणि भाजप नेता प्रदीप जोशी याचा एका मुलाचे लैंगिक शोषण करतांनाचा व्हिडिओ मध्यंतरी खूपच व्हायरल झाला होता. त्यांचे फेसबुकवर असलेले चॅटिंगही व्हायरल झाले होते. प्रदीप जोशी याचे प्रकरण खूप गाजल्यानंतर त्याचा राजीनामा घेण्यात आला. या प्रकरणानंतर त्याची अनेक किस्से बाहेर आले तो पार्टीच्या ऑफिसमध्ये जास्तकाळ न राहता एका फ्लॅटमध्ये राहत असे. तेथे काही मोजक्या मुलांना प्रवेश होता याच्या कहाण्या नंतर बाहेर आल्या. भाजपने याची चौकशी सुरू असल्याचे सांगितले मात्र पुढे काहीही झाले नाही.
मार्च 2017 भोपाळ भाजप नेता भोजपाल सिंग आणि त्याचे दोन सहकारी. एका दलित महिलेला बीपीएलचे रेशनकार्ड देऊ सांगून बलात्कार केला.
फेब्रुवारी 2017 दिल्ली भाजप नेता विजय जॉली महिलेला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना. भाजप सरकारने विशेषतः अमित शहाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस दलाने दाबून टाकली.
फेब्रुवारी 2017 गुजरात भाजप नेता जयेश पटेल याने नर्सिंगची विद्यार्थिनी असलेल्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.
अशा अनेक घटनांमध्ये भाजपचा आणि बलात्काराच्या आरोपींचा जवळचा संबंध आलेला आहे. पण वेळोवेळी भाजपने या घटना आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत दाबून टाकलेल्या आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एका महिलेवर पाळत ठेवल्याचे आरोप झालेले होते. पुढे या महिलेच्या कुटुंबालाच गायब करण्यात आले.
आताही हाथसर येथील बलात्काऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न भाजपवाले करताय. मुलीच्या कुटुंबियांवर सरकारने टाकलेला दबाव हा केवळ यात आरोपी असलेले तरुण हे ठाकूर समाजाचे आहेत आणि मुख्यमंत्री योगीही ठाकूर समाजाचे आहेत. त्यातच ठाकूर समाज हा भाजपची वोट बँक असल्याने तेही या तरुणांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय.
- राहुल बोरसे