उदय लळीत वकिल ते सरन्यायाधीश प्रवास..

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश उदय लळीत यांनी नुकताच सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश लळीत यांचा वकील ते सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पर्यंत झालेला प्रवास मांडला आहे, अभ्यासक महेंद्र वाघमारे यांनी...

Update: 2022-08-27 09:46 GMT

सोलापूर जन्मलेले श्री लळीत हे ६४ वर्षांचे आहेत. त्यांचे आजोबा श्री रंगनाथ लळीत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरमध्ये वकील म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर श्री लळीत यांचे वडील न्यायमूर्ती उमेश लळीत यांनीही हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे. न्यायमूर्ती लळीत यांचा कार्यकाळ फक्त ७४ दिवसांचा असेल व त्यानंतर ते रिटायर होतील.

महाराष्ट्रातील सरकारची संविधानिक वैधता व बंडखोर आमदारांचे उपाध्यक्षांनी केलेले निलंबन ही महत्त्वाची केस श्री. लळीत यांना हाताळायची आहे. श्री लळीत यांनी महाराष्ट्रात १९८३ मध्ये वकिली सुरु करून लगेच १९८५ मध्ये दिल्लीला शिफ्ट झाले. २००४ मध्ये ते सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणून काम करू लागले.

श्री लळीत हे २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. कुठल्याही न्यायालयाचे न्यायाधीश नसताना थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारे श्री लळीत हे फक्त सहावे न्यायाधीश आहेत. न्यायाधीश होण्यासाठी श्री लळीत यांनी कुठलीही परीक्षा पास केलेली नाही.

सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीश होण्यापूर्वी श्री लळीत यांनी क्रिमिनल लॉयर म्हणून काम केलेल आहे. हायप्रोफाईल केस म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल ती केस म्हणजे विद्यमान गृहमंत्री व तात्कालीन गुजरात राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सोहराबुद्दिन व तुळशीराम प्रजापती या फेक एन्काऊंटर केस मध्ये श्री अमित शहा यांचे वकील म्हणून श्री उदय लळीत यांनी काम केलेल आहे.

देशभर गाजलेल्या २G स्पेक्ट्रम घोटाळा केस मध्ये सुप्रीम कोर्टा तर्फे विशेष वकील म्हणूनही श्री लळीत यांनी काम पाहिले आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश झाल्यानंतर २०१७ मध्ये नायमूर्ती लळीत गाजलेल्या ट्रिपल तलाक केस मध्ये बेन्चमधील पाच पैकी एक न्यायाधीश होते.

श्री लळीत यांच्या नियुक्तीने दोन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिला वाद म्हणजे भारतातील न्यायधीश नियुक्तीची ब्रिटिश कालीन कलोजियम सिस्टीम. कलोजियम सिस्टीम मधून सर्वोच्च न्यायालयातील न्यायधीश कमिटी बनवून देशभरातील नायालयांच्या न्यायधीशांची नियुक्ती करतात. मागच्या काही दशकातील माहिती तपासून पाहिली तर असे लक्षात येते की देशभरातील न्यायालयांचे न्यायधीश हे फक्त काही विशिष्ट कुटुंबा मधून नियुक्त केले जात आहेत. तीच तीच कुटुंबे सतत न्यायव्यवस्थेवर तील आपला वरचष्मा पिढ्यानपिढ्या कायम ठेवत आले आहेत. न्यायमूर्ती लळीत यांच्या वडिलानीपण हायकोर्टामध्ये न्यायधीश म्हणून काम पाहिल्यामुळे त्यांनादेखील कदाचित या टीकेचा सामना करावा लागू शकतो.

दुसरा वाद निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती म्हणजे सरकारमधील पावरफूल व्यक्ती आपल्या मर्जीतील व्यक्तीला किंवा अधिकाऱ्यांना कशाप्रकारे महत्वाच्या पदावर बसवतात. आजची नायमूर्ती ललित यांची सरन्यायाधीश म्हणून झालेली नियुक्ती ही त्यांच्या न्यायधीश म्हणून वरिष्ठते प्रमाणे जरी असली तरी श्री लळीत ज्यावेळी सुप्रीम कोर्ट मध्ये वकिली करत होते त्यावेळेस श्री अमित शहा देशाचे नुकतेच गृहमंत्री झाले होते आणि कुठलीही परीक्षा पास न करता श्री लळीत यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी झाली त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागू शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून ते कलोजियम सिस्टीमचे ही पदसिद्ध अध्यक्ष असतील व त्यांच्या अध्यक्षतेखाली देशातील न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल.

(लेखक महेंद्र वाघमारे माजी बँक अधिकारी व पोलिटिकल अभ्यासक आहेत.लेखात मांडलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत. )

Tags:    

Similar News