LIC आयपीओ चे काय होतील परीणाम?
एलआयसीची मालमत्ती किती आणि एलआयसीच्या आयपीओचा दरडोई प्रिमीयमपासून ते नागरीकांना मिळणाऱ्या फायद्यापर्यंत काय परिणाम होणार याविषयी सविस्तर आणि सोप्या शब्दात विश्लेषण केले आहे संजीव चांदोरकर यांनी...;
एलआयसीकडे जवळपास ४० लाख कोटींची गुंतवणूक मालमत्ता आहे. भारतीय संदर्भात हा आकडा खूप मोठा आहे. उदा. यावर्षीचे केंद्रीय बजेट ३९ लाख कोटींचे आहे. त्यामुळे आसा गैरसमज व्हायची शक्यता आहे की, आपल्या देशाचे आयुर्विमा क्षेत्र देखील खूप मोठे आहे. मात्र वस्तुस्थिती खूप वेगळी आहे.
जागतिक कॅनव्हास वर भारताच्या आयुर्विमा क्षेत्रातील आकडे ठेवले तर आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे ते कळते.
आयुर्विमा हा नागरिकांच्या बचत आणि जोखीम क्षमतांचा निर्देशक मानला जातो. त्यासाठी Density हे परिमाण वापरले जाते. दरवर्षी देशात जो प्रिमियम गोळा केला जातो त्या आकड्याला देशातील लोकसंख्येने भागले की जे गुणोत्तर मिळते त्याला density असे म्हणतात. किंवा दरडोई प्रीमियम.
सर्व जगात सर्व देशात गोळा होणाऱ्या प्रीमियम ला जगाच्या लोकसंख्येने भागले तर जगाची सरासरी Life Insurance Density मिळेल . ती घनता 800 डॉलर इतकी आहे. मात्र भारताची सरासरी Density 58 डॉलर इतकी आहे. तर अमेरीकेची 7 हजार 700 डॉलर इतकी आहे.
आयुर्विमा तून जेवढा प्रीमियम जास्त गोळा होईल त्याप्रमाणात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दीर्घकालीन भांडवल उपलब्ध होते. ज्या प्रमाणात दीर्घकालीन भांडवल उपलब्ध त्या प्रमाणात पायाभूत सुविधा वेगाने वाढवता येऊ शकतात. मुद्दा आपला देश आयुर्विमा क्षेत्रात किती मागे आहे हे दाखवण्याचा नाही. ते तर आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे मुद्दा आहे भारतीय आयुर्विमा क्षेत्र किती बाल्यावस्थेत आहे आणि ते विकसित करणे मार्केट मंत्र पठण करणाऱ्या खाजगी आयुर्विमा कंपन्यांचे काम नाही.
ते एलआयसी सारख्या financial returns and development agenda यांची यशस्वी सांगड घालून दाखवणाऱ्या आयुर्विमा संस्थेचे काम आहे. जे काम एलआयसी ने दशकानुदशके अतिशय निष्ठेने केले आहे. आयापिओ ( IPO) नंतर हे मिशन चालू ठेवायला एलआयसी मधील वित्तीय गुंतवणूकदारांचा विरोध असेल. कारण त्यातून ताबडतोब नफ्याच्या पातळीवर परिणाम होईल.
त्यामुळे एलआयसी IPO ने देशात कोणाचे योगक्षेम होणार हे काळच ठरवेल.