सिंगापूरच्या पंतप्रधानांचं महत्त्वाचं विधान : मिलिंद मुरुगकर
जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख करत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी (Singapore Prime Minister Lee Hsien Loong) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्या वक्तव्यात जवाहरलाल नेहरुंच्या नावाचा उल्लेख करत राजकारण्यांचे कान सिंगापूरचे पंतप्रधान ली शिंग लूंग यांनी टोचले आहेत. आपआपल्या राष्ट्रातली लोकशाही (Democracy) कशी अबाधित राहिल, यासाठी कसं काम करायला हवं, यावर सिंगापूरचे पंतप्रधान तिथल्या संसदेत बोलत होते, याविषयी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी मत व्यक्त केलं आहे.
जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख करत सिंगापूरच्या पंतप्रधानांनी (Singapore Prime Minister Lee Hsien Loong) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आपल्या वक्तव्यात जवाहरलाल नेहरुंच्या नावाचा उल्लेख करत राजकारण्यांचे कान सिंगापूरचे पंतप्रधान ली शिंग लूंग यांनी टोचले आहेत. आपआपल्या राष्ट्रातली लोकशाही (Democracy) कशी अबाधित राहिल, यासाठी कसं काम करायला हवं, यावर सिंगापूरचे पंतप्रधान तिथल्या संसदेत बोलत होते, याविषयी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी मत व्यक्त केलं आहे.
यावेळी त्यांनी नेहरुंच्या देशात (Jawaharlal Nehru) जसं संसदेत बलात्कार आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे असलेली लोकं दिसून येत आहेत, तसं आपल्याकडे व्हायला नको, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी विशेषाधिकार समितीच्या अहवालावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
त्यावेळी त्यांनी जवाहरलाल नेहरु यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. जवाहरलाल नेहरु यांची भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक महत्त्वाची भूमिका बजवाली. भारताची लोकशाही उभी करण्यात त्याचं योगदानही मोठं आहे, असं त्यांनी म्हटलंय. मात्र ज्या मूल्यांवर लोकशाही कायम राहायला हवी, ती मूल्य जपण्याची गरज आहे, असंही ते म्हणालेत. पण दुर्दैवीनं काळाच्या ओघात ही मूल्य विसरुन जात ज्यांनी लोकशाही राष्ट्रासाठी लढा दिला, एक नेतृत्त्व म्हणून जी माणसं उदयाला आली, त्यांचे विचार आणि त्यांची मूल्य ही मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सिंगापूरच्या पंतप्रधानांचं महत्त्वाचं विधान
संसदेत बोलताना सिंगापूरच्या पंतप्रधानांनी म्हटले की, नेहरुंनी उभ्या केलेल्या भारत देशातील संसदेबाबत मीडिया रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतातील लोकसभेतल्या अर्ध्याहून अधिक खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात बलात्कार आणि हत्येसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. असंही म्हटलं जातं की, त्यातील बहुतेक गुन्हे राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आले आहेत. सिंगापूरला या मार्गापासून दूर न्यायचं असेल तर काय करावं लागेल?
ज्या प्रमाणे भारतात नेहरुंनी लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला, तसाच संघर्ष आपल्या देशातही झाला. आपल्या देशातच एक मजबूत आणि ताकदवर लोकशाही मूल्यांची पेरणी करण्यात आली. या मूल्यांना जपण्याचं काम येणाऱ्या पिढ्यांनी करणं, ही आपली जबाबदारी आहे.
अप्रत्यक्षपणे त्यांनी लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्यांवर निशाणा साधलाय. फक्त भारतातीलच नव्हे तर अमेरिकेतल्या निवडणुका जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख करत त्यांनी आपली लोकशाहीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 44 मिनिटं 30 सेकंद केलेल्या आपल्या भाषणात ली शिंग लूंग यांनी सहाव्या मिनिटापासून लोकशाही, जवाहरलाल नेहरु आणि लोकशाही मूल्यांवर वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी लोकशाहीला फाटा देणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी केलेलं संसदेतलं भाषण आता भारतातही चांगलंच चर्चेत आलंय.
याबाबत माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करुन व्हिडीओ शेअर केला आहे. सिंगापूरचे पंतप्रधान नेहरूंना संसदीय चर्चेदरम्यान लोकशाहीत काम कसे करावे याविषयी युक्तिवाद करण्यासाठी नेहरुंचे उदाहरण दिले तर तर आमचे पंतप्रधान (मोदी) संसदेच्या आत आणि बाहेर नेहमीच नेहरूंची बदनामी करतात, असं सांगितलं आहे.